राष्ट्रकुल स्पर्धा : पैलवान सुशील कुमारने भारताला मिळवून दिले १४ वे सुवर्णपदक

गोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये आज भारताचा पैलवान सुशील कुमारनेही फ्री-स्टाइल कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवले. महाराष्ट्राच्या राहुल आवारे पाठोपाठ सुशील कुमारनेही कुस्तीत भारताला सुवर्णपदकाची कमाई करुन दिली आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेत पैलवान सुशीलकुमारने ७४ किलो वजन गटाच्या कुस्तीमध्ये सुवर्ण पदकाची कामगिरी केली. सुशील कुमारने ७४ किलो वजन गटात दक्षिण आफ्रिकेच्या प्रतिस्पध्याला अवघ्या १ मिनीट २० सेकंदात आसमान दाखवले आहे. याचबरोबर सुशील कुमारने हॅटट्रीक केली आहे. त्याने जिकंलेल्या पदकामुळे भारताच्या खात्यामध्ये एकूण १४ सुवर्णपदके जमा झाली आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताने आतापर्यंत ४ पदके पटकावली आहेत. सध्या भारताकडे १४ सुवर्ण, ६ रौप्य आणि ९ कांस्य पदके आहेत.