लवकरच लागणार शुभमंगल ऑनलाईन

Shubhmangalam Online

लॉकडाऊन नंतर अनेक मराठी वाहिन्या वर नवीन मालिकांचे प्रोमो बघायला मिळतात. जुन्या मालिकांच्या सोबतीने नवीन मालिका आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं दिसतंय. झी मराठी , स्टार प्रवाह , कलर्स मराठी अश्या विविध वाहिन्यांवर या नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मराठी मालिका नेहमीच आपल्या प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळ्या विषयांच्या कथा असलेल्या मालिका घेऊन येणाच्या प्रयत्न करत असतात. अनेक फ्रेश जोड्या सोबत या नव्या कोऱ्या मालिका आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार आहेत. बघूया आता कोणती वाहिनी नवी मालिका आपल्या भेटीला घेऊन येते आहे.

कलर्स मराठी लवकरच प्रेक्षकांसाठी अजून एक नवीकोरी मालिका घेऊन येणार असल्याचं समजतंय. नुकताच या नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून हा खास प्रोमो आपल्या भेटीला आला आहे. कलर्स मराठीवर सुबोध भावे यांच्या कान्हाज मॅजिक या निर्मिती संस्थेअंतर्गत ” शुभमंगल ऑनलाइन ” (Shubhmangalam online ) ही नवी कोरी मालिका लवकरच सुरू होणार  आहे. एक फ्रेश जोडी या मालिके मधून आपल्याला बघायला मिळणार आहे. अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री सायली संजीव हे दोघे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सोबतीला अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने यांची देखील या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचं समजतंय. ” शुभमंगल ऑनलाईन ” ही मालिका निर्मात्या सोबत कलाकारांसाठी देखील का खास आहे.

Shubh Mangal Online Start Date, Story, Promo, Colors Marathi Time Tableअभिनेता आणि निर्माता सुबोध भावे  (Subodh Bhave)यांची निर्मिती असलेली ही पहिली मालिका आहे. नवनवीन विषयावर मालिकेतून काहीतरी अनोखं दाखवण्यासाठी ही मालिका येणार आहे. आपल्या रोजच्या आयुष्यातील घडणाऱ्या आणि तितकंच आपलंसं करून घेणाऱ्या काहीतरी भन्नाट विषयावर ही मालिका असणार आहे. मालिकेची गोष्ट ही अगदी हलकी फुलकी असून त्यातले कलाकार देखील तितकेच प्रेक्षकांच्या आवडीचे आहेत.

कॉफी आणि बरंच काही , क्लासमेट अश्या चित्रपटातुन आपल्या भेटीला आलेला अभिनेता सुयश टिळक या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नाटक , चित्रपट आणि मालिकेतुन अभिनयाची अनोखी शैली जपत त्याने आजवर विविध भूमिका बजावल्या आहेत.का रे दुरावा , बापमाणुस या मालिकेतुन घराघरात पोहचलेला अभिनेता म्हणून सुयश ची ओळख आहे. अभिनया पलीकडे जाऊन सुयश फोटोग्राफी करतो लॉकडाऊन दरम्यान ” पडद्यामागचं विथ सुयश टिळक ” हे अनोखं लाईव्ह सेशन देखील त्याने केलं आहे. नव्या मालिकेत सुयश नक्की कोणाची भूमिका साकारणार आहे हे बघणं उत्सुकतेच असणार आहे.

” काहे दिया परदेस ” या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेली अभिनेत्री सायली संजीव. सायली ने आजवर चित्रपट , वेब सीरिज आणि मालिका मधून उत्तम अभिनय केला आहे. आटपाडी नाईट्स या गाजलेल्या चित्रपटातुन तिने वेगळी भूमिका साकारली आहे. तसच एबी आणि सीडी या चित्रपटातील तिची भूमिका लक्षवेधी ठरली. मराठी सोबत तिने हिंदी मालिकेतून देखील काम केलं आहे. या नव्या मालिकेतुन आता सायली नक्कीच अफलातून भूमिका साकारणार यात शंका नाही.

अभिनेता आणि निर्माता अशी दुहेरी भूमिका बजावत सुबोध भावे यांच्या निर्मिती संस्थेअंतर्गत ही मालिका कलर्स मराठीवर येणार आहे. मालिकेचा प्रोमो शेयर करताना दोघे कलाकार म्हणतात ” डिजिटल युगात होती विडिओ कॉल वरच साऱ्या भेटीगाठी , जुळतील का आता ऑनलाइन लग्नाच्या गाठी ? ” असं म्हणत या दोघांनी नव्या मालिकेचा प्रोमो शेयर केला आहे. सायली ने सोशल मीडियावर लवकरचं काही तरी घेऊन येणार आहोत अशी पोस्ट टाकली होती तेव्हा पासून सगळयांना तिच्या नव्या भूमिके बद्दल आणि नव्या कामाबद्दल उत्सुकता लागली होती. सायली आणि सुयश यांची कमालीची जोडी लवकरच ” शुभमंगल ऑनलाइन ” या मालिकेतून बघायला मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER