म्यूझिक व्हिडियोमध्ये काम करून चित्रपटात आली श्रिया सरन

Shriya Saran

दक्षिण भारतीय चित्रपटांसह हिंदी चित्रपटातही स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या श्रिया सरनचा उद्या वाढदिवस आहे. मात्र श्रियाने (Shriya Saran) चित्रपटात येण्यापूर्वी एका म्यूझिक व्हीडियोमध्ये काम केले होते. आणि ते काम पाहूनच तिला चित्रपटात ब्रेक मिळाला होता हे फार कमी लोकांना ठाऊक आहे.

11 सप्टेंबरला उत्तराखंडची राजधानी असलेल्या डेहराडूनमध्ये श्रियाचा जन्म झाला. सर्व शिक्षण दिल्लीत झाले. श्रिया एक कत्थक आणि राजस्थानी लोकनृत्यात पारंगत असून आपल्या आईकडून तिने नृत्याचे प्रशिक्षण घेतलेले आहे. श्रिया चांगला डांस करीत असल्यानेच तिला ‘थिरकती क्यूं हवा’ या म्यूझिक व्हीडियोमध्ये काम मिळाले. यात तिने आपल्या नृत्याची कमाल दाखवली होती. हा म्यूझिक व्हीडियो दक्षिणेतील प्रख्यात निर्माता दिग्दर्शक, दिग्दर्शक रामोजी राव यांनी पाहिला आणि लगेचच ‘इस्थम’ चित्रपटासाठी श्रियाला साईन केले.

अशा तऱ्हेने श्रियाचा दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. रामोजी राव यांनी साईन केल्याने श्रियाला आणखी चार निर्मात्यांनी साईन केले आणि श्रिया दक्षिणेतील टॉपची नायिका झाली. तामिळ, तेलुगु, कन्नड़ आणि मल्याळम चित्रपट केल्यानंतर बॉलिवुडमध्ये 2003 मध्ये आलेल्या ‘तुझे मेरी कसम’मध्ये सहाय्यक नायिकेची भूमिका मिळाली. सुपरस्टार रजनीकांतसोबत श्रियाने ‘शिवाजी द बॉस’ केला तर बॉलिवुडमध्ये अजय देवगनसोबत केलेल्या दृश्यममुळे चांगली ओळख मिळाली. एका रशियन तरुणाबरोबर श्रियाने लग्न केले असून सध्या ती रशियात सुट्टीचा आनंद घेतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER