शिवरायांचा अवमान करणाऱ्या छिंदमला ‘ठाकरे’ सरकारचा दणका; नगरसेवकपद रद्द

Shripad Chhindam-Uddhav Thackeray

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढून अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदम याला ‘ठाकरे’ सरकारने मोठा दणका दिला आहे. महापुरुषांबद्दल अपशब्द काढल्याप्रकरणी श्रीपाद छिंदम याचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

छिंदम याने 16 फेब्रुवारी 2018 रोजी महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याशी मोबाइलवर बोलताना शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याची क्लीप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. अनेक ठिकाणी त्याच्याविरुद्ध आंदोलनं करण्यात आली. त्यानंतर भाजपाने छिंदमची पक्षातून हकालपट्टी करत त्याच्याकडून उपमहापौरपदाचाही राजीनामाही घेतला होता. त्यानंतर त्याचे नगरसेवकपदही रद्द करण्याचा ठराव अहमदनगरच्या महानगरपालिकेत पारीत करण्यात आला होता.

दरम्यान, छिंदम याने २०१८ मध्ये झालेली अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्यावेळी याच्याही तडीपारीचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाने ठेवला होता. त्यावर सुनावणी झाल्यानंतर छिंदमच्या तडीपारीचे आदेश देण्यात आले होते. मात्र असे असूनही श्रीपाद छिंदम अहमनगर महानगरपालिकेच्या प्रभाग ९ (क) मूधन सर्वसाधारण जागेवर अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आला होता.

इंदोरीकर महाराजांच्या कार्यक्रमाला युवासेनेचे संरक्षण, गडबड करणाऱ्यांना दिला इशारा