श्रीकुट्टीचा वाढदिवस पुनर्वसन केंद्रात दणक्यात साजरा झाला !

श्रीकुट्टी

कप्पूकडू : केरळमधील (Kerela) कप्पूकडू (Kappukadu) येथील हत्तींच्या पुनर्वसन केंद्रात श्रीकुट्टी या हत्तीच्या पिलाचा पहिला वाढदिवस ८ नोव्हेंबर रोजी दणक्यात साजरा करण्यात आला.

श्रीकुट्टीसाठी ऊस, गूळ आणि अननसाचा मोठा केक तयार करण्यात आला होता. केंद्रात आलेल्या पर्यटकांनीही या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला. मोबाईलमध्ये कर्यक्रमाचे फोटो काढले. काहींनी श्रीकुट्टीसोबतही फोटो काढले; काही तिच्यासोबत खेळले.

८ नोव्हेंबर हा श्रीकुट्टीचा जन्मदिवस नाही. तिचा जन्मदिवस कोणालाही माहीत नाही. तिला ८ नोव्हेंबरला या पुनर्वसन केंद्रात आणले, त्याची आठवण म्हणून हा दिवस तिचा वाढदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

हत्तींच्या या पुनर्वस केंद्रात अनाथ, जखमी हत्तींचे पालन-पोषण करून त्यांचे पुनर्वसन करण्यात येते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER