श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ३० सप्टेंबरपर्यंत राहणार बंद

shri vitthal rukmini temple

पंढरपूर : थील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ३० सप्टेंबरपर्यंत भाविकांसाठी बंद राहणार आहे. मंदिर व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. मंदिराचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी भाविकांच्या माहितीसाठी यासंदर्भात पत्रक काढले आहे. करोनाची साथ लक्षात घेऊन मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी यासंदर्भात आज (मंगळवारी) बैठक घेतली. त्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे, ते ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहील. दरम्यान, काही दिवसांपासून अनेक स्तरांतून मंदिर आणि अन्य धार्मिक स्थळं  उघडण्याची मागणी करण्यात येते आहे. आता राजकीय पक्षही या आंदोलनात उतरले आहेत.

अनलॉकचा चौथा टप्पा सुरू झाला असला तरी धार्मिक स्थळं  आणि शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्यातील लॉकडाऊनही ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मंदिर समितीनेही ३० सप्टेंबरपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER