श्री मंगलमूर्ती मंदिर, चिंचवड

Shri Mangalmurti Temple, Chinchwad

थोर गणेशभक्त मोरया गोसावी (GaneshaBhakt Morya Gosavi) यांनी या गणपतीची प्रतिष्ठापना केली. गणपतीची सेवा करत असतानाच १६५५ ला समाधी घेतली. हे देवस्थान पुण्याजवळ चिंचवड येथे आहे. मंदिरातील मूर्ती उजव्या सोंडेची असून मांडी घालून बसलेली आहे. विशेष म्हणजे या मूर्तीला दोनच हात आहेत. या देवस्थानाला अर्ध्या पीठाची मान्यता आहे.

Morya Gosaviमोरया गोसावी यांच्याबाबत दोन दंतकथा प्रचलित आहेत. एका कथेनुसार मौर्य यांचा जन्म कर्नाटकमधील बिदरमधे झाला. हा मुलगा काही कामाचा नाही म्हणून वडिलांनी त्यांना घराच्या बाहेर काढून दिले. ते मोरगावला आले. तिथे ते गणपतीचे भक्त झाले. नंतर ते चिंचवडला आले आणि तिथेच स्थायिक झालेत.

दुसऱ्या कथेनुसार गणपतीच्या आशीर्वादाने पुण्यातील एका धार्मिक सत्शील गरीब कुटुंबाच्या पोटी मोरया गोसावी यांचा जन्म झाला होता.

भाद्रपद शुक्ल प्रतिपदेला गणपतीची(Ganpati) पालखी चिंचवड येथून मोरगावला जाते.

मोरया गोसावी यांच्या कुटुंबात सात पिढ्यांपासून गणेश भक्तीची परंपरा चालत आली आहे. असे सांगतात की या गोसावी कुटुंबातील सात पिढींमधील पुरुषांच्या दहनानंतर त्यांच्या दहनस्थळावर गणेशशिळा सापडत गेली! त्यांची स्थापना दहनभूमीतच करण्यात आली.

या क्षेत्राला समर्थ रामदास स्वामी (Ramdas Swami) आणि तुकाराम महाराजही मानत होते. छत्रपती शाहू महाराज नवे कार्य सुरू करण्यापूर्वी या गणपतीचा आशीर्वाद घेत होते.

चिंचवड (Chinchwad) हे प्राचीन काळी वैभवशाली गाव होते . इथे एक टांकसाळही होती.

– देवदास चव्हाण 
मोबाईल : ९३२२३ ४४६९३

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER