श्री गणरायांनी सगळी संकटं दूर करावी ; महाराष्ट्राची सर्व क्षेत्रात भरभराट व्हावी – उपमुख्यमंत्री

Ajit Pawar

मुंबई : आज २०२१ सालातली पहिली गणेश चतुर्थी अर्थात माघी गेणेश चतुर्थी. (Genesh Chaturthi) या दिवसाच्या निमित्ताने पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदीराला फुलाची आरास करण्यात आली आहे. तर, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही माघी गणेश चतुर्थिच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, देश राज्यावरील संकंटं दूर व्हावीत अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.

‘सुखकर्ता, विघ्नहर्ता श्री गणरायांना माघी गणेशजयंतीच्या निमित्तानं भावपूर्ण वंदन करतो. श्री गणरायांनी राज्यावरचं, देशावरचं कोरोनाचं संकट दूर करावं. सर्वांना स्वच्छंद फिरता येईल, असं कोरोनामुक्त वातावरण पुन्हा निर्माण व्हावं. महाराष्ट्राची सर्व क्षेत्रात भरभराट व्हावी. जनतेच्या जीवनातील दू:खं दूर होऊन प्रत्येकजण सुखी, समाधानी, आनंदी व्हावा, अशी प्रार्थना मी श्री गणरायांच्या चरणी करतो. आपल्या सर्वांना माघी गणेश जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा देतो.’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील जनतेला माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच, माघी गणेश जयंती साजरी करताना कोरोना प्रतिबंधक नियमांचं तसेच आरोग्य विभागाच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

त्याचप्रमाणे आज थोर समाजसुधारक, क्रांतीकारी संत सेवालाल महाराज यांची आज जयंती आहे. अजित पवार यांनी त्यांनाही वंदन केले आहे.

संत सेवालाल महाराजांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, संत सेवालाल महाराज हे त्यागी, दूरदर्शी आणि बुध्दीप्रामाण्यवादी विचारांचे महान संत होते. ‘कोणतीही बाब आधी माहित करून घ्या, शिकून घ्या, प्रत्येक गोष्ट पडताळून पहा, नंतरच त्याचा अवलंब करा’ अशी शिकवण त्यांनी दिली. त्यांनी निसर्गाचे महत्व पटवून देत निसर्गाचा ऱ्हास रोखण्याचे आवाहन त्यांनी केले होते, यापुढच्या काळात पैसे देऊन पाणी विकत घेण्याची वेळ येईल, हे दूरदर्शी विचार त्यांनी त्याकाळी मांडले. देशभर फिरुन निसर्गाप्रती संवेदनशील होण्याबरोबरच शिक्षणाचे महत्व समाजाला पटवून देण्याचे काम केले. समाजाला विज्ञानवादी, बुद्धीप्रामाण्यवादी, इहवादी होण्याची शिकवण दिली. त्यांच्या दोहे आणि भजनांनी समाजाला सन्मार्गावर नेण्याचं कार्य केलं. संत सेवालाल महाराजांच्या विचारांवर सर्वांनी मार्गक्रमण करण्याचा निर्धार आपण सर्वांनी करुया, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER