श्री गणपती पंचायतन संस्थान मंदिर, सांगली

श्री गणपती पंचायतन संस्थान मंदिर

सध्याच्या चिंतामणी नगरमध्ये (Chintamani Nagar) हे देवस्थान (Devsthan) आहे. हे सांगलीचे आराध्य दैवत आहे. पेशव्यांच्या काळात चिंतामणराव पटवर्धन यांनी १८४३ मध्ये हे मंदिर बांधले. मंदिराचे शिखर ८०० फूट उंच आहे.

चतुर्भूज मूर्ती डाव्या सोंडेची असून सोबत रिद्धी – सिद्धीही (Riddhi – Siddhi) आहेत. मंदिर दिशा साधन तंत्राचा वापर करून बांधले असल्याने दुरून, बाजारपेठेतून गणपतीचे दर्शन होते.

मंदिराचा परिसर अडीच एकर असून ३ मुख्य चौकात विभागला आहे. मधल्या चौकात मुख्य मंदिर असून भोवताल श्री चिंतामणीशेश्वर (श्री शंकर), श्री सूर्यनारायण, श्री चिंताणेश्वरी देवी आणि श्री लक्ष्मी – नारायण (Shree Laxami-Narayan)अशी एकूण ५ मंदिरे आहेत. मंदिर राजस्थानच्या लाल दगडांनी बांधले आहे. सांगली (Sangli) आणि सांगलीवाडी या २ गावांत मंदिराला जमीन मिळाली आहे.

– देवदास चव्हाण
मोबाईल : ९३२२३ ४४६९३

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER