श्री गणपती पंचायतन, तासगाव

श्री गणपती पंचायतन

श्री गणपती पंचायतनदेवस्थान सांगली (Sangli) जिल्यातील तासगाव येथे देवस्थान आहे. पेशव्यांचे सेनापती, तासगाव संस्थांचे संस्थापक, थोरले परशुरामभाऊ पटवर्धन यांना गणपतीचा दृष्टांत झाल्यानंतर १७८५ ते १७९९ दरम्यान त्यांनी या गणपतीची स्थापना केली. मूर्ती शुभ्र गारेची, उजव्या सोंडेची दीड फूट उंच सिहासनाधिष्ठ आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूला उंदीर आहेत.

मंदिराची रचना पंचायतन आहे. मधे श्री गणपतीची मूर्ती असून उजव्या बाजूला उमा रमेशवर आणि डाव्या बाजूला श्री विष्णुचे मंदिर आहे. प्रदक्षणेच्या मार्गावर सूर्याचे आणि देवीचे मंदिर आहे. मंदिर २०० वर्षांपेक्षा जुने आहे.

ही बातमी पण वाचा : सारसबाग सिद्धिविनायक मंदिर, पुणे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER