श्री चिंतामणी गणपती, कळंब

श्री चिंतामणी गणपती

कळंबचा (Kalamb) चिंतामणी (Chintamani Ganapati) गणपती विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक आहे. स्वयंभू आहे. या देवस्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे गणपतीचे मंदिर जमिनीच्या सपाटीपासनू २१ मिटर खोलवर आहे. कळंब हे तालुक्याचे ठिकाण असून यवतमाळ (Yavatmal) तालुक्यात येते.

श्री चिंतामणी गणपतीया देवस्थानाबाबत अशी आख्यायिका आहे की गौतम ऋषींच्या शापामुळे इंद्राला चर्मरोग झाला. इंद्राने ऋषींची सेवा करून उ:शाप मागिलता तेंव्हा त्यांनी इंद्राला सांगितले की कदंबबन शोधून तिथे गणपतीची स्थापना कर आणि त्याच्या तीर्थाने स्नान कर.

इंद्राने कदंबबन शोधून गणपतीची प्रतिष्ठापना केली. गणपतीच्या तीर्थाने स्नान केले आणि रोगमुक्त झाला. ते गणपतीचे ठिकाण हेच कळंब आहे. मंदिराच्या आवारातच जिवंत झऱ्याचे कुंड आहे, त्याचे पाणी हे या गणपतीचे तीर्थ आहे.

मंदिर जमिनीच्या पातळीच्या खाली असल्याने, मंदिरात जाण्यासाठी २९ पायऱ्या उतरून जावे लागते. चिंतामणीच्या मूर्तीच्या जवळच अनसूयेची मूर्ती आहे. ही मूर्ती उत्तखननात सापडली असे सांगतात. माघ महिन्यात उत्सव असतो. षष्टीला दहिहंडीने उत्सवाचा समारोप होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER