IPL २०२० DC vs SRH: पराभवानंतर आणखी एका नव्या अडचणीत सापडला श्रेयस अय्यर

Shreyas Iyer

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध स्लो ओवर (Slow over) रेटसाठी दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरवर जोरदार दंड ठोठावण्यात आला आहे.

इंडियन प्रीमियर लीग २०२० सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान दिल्ली कॅपिटलसचा (DC) कर्णधार श्रेयस अय्यरला स्लो ओवर रेटसाठी १२ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. मंगळवारी झालेल्या या सामन्यात दिल्ली संघाला १५ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

इंडियन प्रीमियर लीगच्या प्रेस विज्ञप्तिनुसार, ‘आयपीएल किमान ओव्हर स्पीड उल्लंघनाशी संबंधित आचारसंहितेअंतर्गत त्याच्या संघाचा या हंगामाचा हा पहिला उल्लंघन होता, त्यामुळे अय्यर वर १२ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला.’ याआधी विराट कोहलीला स्लो ओवर रेससाठीही दंड ठोठावण्यात आला होता. त्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने फलंदाजीदरम्यान अनेक चौकार आणि षटकार ठोकले, त्यामुळेच त्यांचा डाव सुमारे १ तास ५१ मिनिटे चालला आणि यामुळे विराट कोहलीला त्रास सहन करावा लागला.

विशेष म्हणजे अबू धाबी मैदानावर SRH ने प्रथम फलंदाजी करताना DC समोर विजय मिळवण्यासाठी १६३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. त्याला उत्तर म्हणून दिल्ली संघ निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून केवळ १४७ धावा करू शकला. रशिद खानला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी (३ विकेट) ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER