२१ वर्षाची श्रद्धा दुग्धव्यवसायातून कमावतीये महिन्याला सहा लाख रूपये.

Shraddha, 21, earns Rs 6 lakh a month from dairy business.

मोठ्या वयात यशशिखर गाठणं ही काही इतकी मोठी गोष्ट नाही पण लहान वयात यशस्वी होणं ही असमान्य गोष्ट असते. महाराष्ट्राच्या अहमदनगरपासून ६० किमी अंतरावरच्या निघोज गावची रहिवासी २१ वर्षीय श्रद्धा धवन (Shraddha Dhawan) वडीलांचा डेअरी फार्म चालवतीये आणि प्रतिमाह सहा लाख रुपये (Rs 6 lakh) कमावती आहे. घरात कधीच सहा म्हैशींहून जास्त म्हैशी कधीच नव्हत्या, एक काळ असा होता जेव्हा घरात एकही म्हैस नव्हती ही गोष्टय १९९८ची.

त्यावेळी श्रद्धाचे वडील सत्यावन मुख्यतः म्हैशींच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचे. दुध विक्री (dairy business) त्यांच्यासठी अवघड काम होतं. अपंग असल्यामुळं त्यांना अनेक शारिरीक मानसिक आव्हानांना तोंड द्यायला लागायच. २०११ला परिस्थीती बदलली. म्हैशींच्या उठाठेवीची आणि खरेदी विक्रीची श्रद्धावर जबाबदारी आली.

तिच्या वडिलांना दुचाकी चालवता यायची नाही. आणि कोणतीच जबाबदारी घेण्याइतका तिचा भाऊ वयाने मोठा नव्हता. म्हणून ११ व्या वर्षीच तिनं ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्यावेळी श्रद्धा खुप वेगळ्या विचारात होती. तिच्या आधी गावात कुणीच अशाप्रकारची जबादारी उचलली नव्हती.

सकाळी उठून तिच्या वर्गातील मुलं मुली शाळेत जाण्यासाठी आवरा आवर करायचे तेव्हा श्रद्धा दुध विक्रीला गाडीवरुन जायची. त्यावेळी ही जबाबदारी निभावणं कठिण काम होतं पण श्रद्धानं अजिबात माग वळून पाहिलं नाही.

आज श्रद्धा तिच्या वडीलांचा व्यवसाय सामर्थ्यानं चालवते आहे. तिनं दोन मजली गोठा बांधून त्यात ८० म्हैशींचा संभाळ सुरु केलाय. श्रद्धाच्या आर्थिक परिस्थीत बरेच सुधार झालेत. यातून ती प्रतिमाह ६ लाख रुपये कमावते. श्रद्धानं व्यवसायात लक्ष घातल्यापासून व्यवसाय तेजीत आला. २०१३पर्यंत दुध वाटपासाठी मोठे कॅन लागायचे. ते वाहून नेण्यासाठी बाईकची गरज तिला होती. त्यावेळी तिच्याकडे १२ म्हैशी होत्या. आणि त्यांच्यासाठी नवा गोठा तिने या वर्षी बांधला.

श्रद्धा गाडीवर केन लादून त्यातून दुध वाहून न्यायची. या आधी गावात कुणीच मुलीला सायकल चालवताना पाहिलं नव्हतं.

२०१५ला श्रद्धा दहावीची परिक्षा असताना सुद्धा ती रोज १५० लीटर दुध विकायची. २०१६पर्यंत तिनं ४५ म्हैशी खरेदी केल्या. यातून ती प्रतिमहिना ३ लाख रुपये कमवू लागली.

सुरुवातीला प्रचंड अडचणीचा सामना करावा लागला. या अधिच कोणती मुलगी बाईक चालवत नव्हती. गावकऱ्यांना श्रद्धाचा अभिमान होता. गावकऱ्यांनी श्रद्धाला प्रोत्साहित केलं. त्यांच्या गोष्टी ऐकून श्रद्धाचा आत्मविश्वास बळावला. आणि या कामांमध्ये तिची रुची वाढ गेली.

हळू हळू श्रद्धाने म्हैशींची संख्या वाढवली. अनेक संकटांमधून तिनं वाट काढली. जनावरांच्या चाऱ्याची भीषण समस्या होती. आधी म्हैशींची संख्या कमी होती तर घरगुती चाऱ्यातून काम चालायच पण नंतरच्या काळात म्हैशींची संख्या वाढली. चारा बाहेरून खरेदी करुन विकणे परवडत नव्हते. मंदिचे दिवस सुरु झाले. प्रतिमहिन्याच्या खर्चासाठी फक्त ५ ते १० हजार उरायचे.

यात जैविक चाऱ्याची मोठी मदत झाली. जवळपासच्या शेतात जैविक चाऱ्याचे उत्पन्न घ्यायला लोकांनी सुरुवात केली.

श्रद्धा आता ८० म्हैशींच्या दुध विक्रीतून सहा लाखांचे प्रतिमहिना उत्पन्न घेते आहे. श्रद्धाचा भाऊ अभियांत्रिकीचे शिक्षण घेतोय. आगामी काळात डेअरी व्यवसाय यशाची कोणती दारं श्रद्धासाठी खुली करेल हे माहिती नसलं तरी श्रद्धानं व्यवसायाचे स्वरुप वाढवायचे ठरवलंय.

श्रद्धा तिच्या यशाचे श्रेय तिच्या कुटुंबाला देते. तिचा भाऊ आणि आई तिच्या पाठी खंबीर उभपणे उभे असल्यामुळं तिला व्यवसायातल्या चढउतारांची भिती वाटत नाही तर दुसऱ्या बाजूला तिच्या वडीलांनी गाडीवरुन दुध विकण्यासाठी तिला दिलेल्या प्रोत्साहनामुळंच ती यशस्वी झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER