कोरोना काळात राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवून द्या; अमोल कोल्हेंचे आवाहन

Amol Kolhe

मुंबई : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी आणि भाजप नेते पुन्हा एकदा जोर पकडत आहेत. “कोरोनाच्या काळात राजकारण करणाऱ्या प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून देण्याची संधी आली आहे.” असे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी जनतेला मतदानाचे आवाहन केले.

“पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून भगिरथ भालके निवडणूक लढवित आहेत. दिवंगत आमदार भारतनाना भालके यांच्या अकाली निधनामुळे ही निवडणूक लागली आहे. भारतनानांवर या मतदारसंघातील जनतेने अलोट प्रेम केलं. भारतनानाही येथील जनतेला आपल्या कुटुंबातील एक घटक मानत असत. भालके कुटुंबीयांशी असणारा हा स्नेह जपत मतदार भगीरथ भालके यांना विजयी करतील हा विश्वास आहे. या निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांना आवाहन आहे की, मतदान यंत्रावरील घड्याळाचे बटण दाबून भगीरथ भालके यांना भरघोस मतांनी विजयी करा.” असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्विटच्या माध्यमातून केले आहे.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्याशी सामना आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली आहे. राष्ट्रवादीकडून भारत भालकेंचे पुत्र भरीरथ भालके यांनाच तिकीट देण्यात आले आहे. तर परिचारक गटाने मंजुरी दिल्यानंतर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली गेली. हे दोन्ही उमेदवार तगडे असल्यामुळे ही पोटनिवडणूक अतिशय चुरशीची ठरेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button