‘मला पाडून दाखवा!’ अजित पवारांचे मुनगंटीवारांना खुले चॅलेंज

Ajit Pawar - Sudhir Mungantiwar

मुंबई :- हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाचेही हिवाळी अधिवेशन वादळी होत आहे. सभागृहात आज भाजप (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली. माझ्या भाषणात जो अडथळा आणतो, तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही, अशी आरोळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी विधिमंडळातच ठोकली.

त्यानंतर मुनगंटीवारांचं चॅलेंज थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारलं. तुमचं आव्हान मी स्वीकारतो, मला पाडून दाखवा, असं खुलं आव्हान अजितदादांनी (Ajit Pawar) दिलं. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुरवणी मागण्या, हक्कभंग प्रस्ताव अशा विविध मुद्यांवरून ठाकरे सरकारला (Thackeray Government) कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विमानतळापेक्षा एसटी महत्त्वाची आहे, मुख्यमंत्री कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पैसे दिले; पण आमदारांच्या वाहनचालकांना दिले नाहीत. दिव्यांगांचे पैसे दिले नाहीत, असे दावे मुनगंटीवार करत होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यावर “माझ्या भाषणात जो अडथळा आणतो तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही.” असा फटकारा मुनगंटीवारांनी मारला. त्यावर अजित पवारांनीही तुमचं आव्हान मी स्वीकारतो, मला पाडून दाखवा, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांना निरुत्तर केलं. दरम्यान, सभागृहात जुलै महिन्यात जन्म झालेल्या व्यक्तींचे स्वभाव, भविष्य ते भाजप शिवसेनेची युती, तसेच अजितदादा- फडणवीसांचा तो शपथविधी  अशा सर्वच विषयांवरून सुधीर मुनगंटीवार आणि अजित पवार यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली.

काय झाले सभागृहात?

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुरवणी मागण्या, हक्कभंग प्रस्ताव अशा विविध मुद्यांवरून ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विमानतळापेक्षा एसटी महत्त्वाची आहे, मुख्यमंत्री कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पैसे दिले; पण आमदारांच्या वाहनचालकांना दिले नाहीत. दिव्यांगांचे पैसे दिले नाहीत, असे दावे मुनगंटीवार करत होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यावर “माझ्या भाषणात जो अडथळा आणतो तो पुन्हा कधी जिंकू शकत नाही.” असा फटकारा मुनगंटीवारांनी मारला. त्यावर अजित पवारांनीही तुमचं आव्हान मी स्वीकारतो, मला पाडून दाखवा, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांना निरुत्तर केलं. सुधीरभाऊ म्हणाले, “ऑक्सफर्ड विद्यापीठात रसेल फॉस्टर नावाचा एक अभ्यासक आहे. त्याने एक सिद्धांत मांडला आहे, की तुमचा जन्म महिना तुमचे आचरण आणि कृती प्रभावित करतो. म्हणजेच महिन्यानुसार तुमचे व्यक्तिमत्त्व ठरते. माझा, तुमचा (अजित पवार), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा जन्म महिना जुलै आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे-अजित पवार यांच्या हातात महाराष्ट्र निश्चितपणे सुरक्षित असावा, याची मला खात्री झाली.” अशी फटकेबाजी सुधीर मुनगंटीवार करत होते.

जुलै महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य

“जुलै महिन्यातील व्यक्तिमत्त्वाचे गुण मी पाहिले. त्यात काय लिहिलंय…  आप मासूम होते हो…  हे पाहिलं ना महाराष्ट्राने… आप दुसरो के प्रति  संवेदनशील होते हो… मी एकही शब्द खोटा वाचत नाही…  नाहीतर आयुष्यभर राजकारणातून बाद होईन… ते संवेदनशील होते, म्हणून तर आम्ही एकत्र आलो ना… असं आपोआप एकत्र येतं होय? आमच्या मनात जनहिताची तीव्र इच्छा आहे…” अशी टोलेबाजी मुनगंटीवारांनी केली. (Sudhir Mungantiwar challenge accepted by Ajit Pawar)

“… पर हमारा रिश्ता टूट गया”

“अजितदादा.. हे तुमच्यासाठी, माझ्यासाठी, मुख्यमंत्र्यांसाठी आणि देवेंद्रजींसाठी लागू होतं… आपको आप के परिवार की बहुत परवा होती है.. माझं कुटुंब माझा परिवार, हे त्यातून आलं. फक्त एक वाक्य इथे लागू होत नाही. मी त्या रसेल फॉस्टरचा पत्ता घेऊन पाठवणार आहे. आप अपने रिश्ते को बचाने के लिये किसी भी हद तक जा सकते हो… पर हमारा रिश्ता टूट गया… इथे काही तरी चुकलं.” असा टोमणा मुनगंटीवारांनी मारला. “कठीण परिश्रम के लिये इनके मन में बहुत सन्मान होता है… आणि हे दादांना पाहिलं की मला पटतं.

कारण अजितदादा सकाळी सहा-सात वाजता उठून कामाला लागतात. उद्धवसाहेब कठीण परिश्रम घेतात, देवेंद्रजी तर घेतातच. थोडी माझ्यातच कमतरता आहे.” अशी मिस्कील  टिपणीही त्यांनी केली. “याच्यामध्ये आणखी एक वाक्य आहे… एकनाथराव…. ते मात्र खोटं ठरलं. माता-पिता को तकलीफ पहुचें ऐसा कोई व्यवहार जुलै महिने में जनम लेने वाले नहीं  करते… माझ्या डोळ्यासमोर श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे आले… मी त्यांच्या व्हिडीओवर गेलो, त्यांची भाषणं ऐकली… ” असा जोरदार टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.

ही बातमी पण वाचा : अजित पवार – देवेंद्र फडणवीसांमध्ये खडाजंगी ; मंत्र्यांच्या बंगल्यांवरील खर्चावरून वादंग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER