वीज तोडून तर दाखवा : राजू शेट्टी यांचा इशारा

कोल्हापूर :- लाॅकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिल कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही वीजबिल भरणार नाही. त्यामुळे शक्तीने वीजबिल वसूल करण्याचा प्रयत्न केल्यास तसेच वीज कनेक्शन तोडण्याचा प्रयत्न केल्यास आम्हाला सुद्धा दोन हात करावे लागतील मग वीज तोडून तर दाखवाच, (Power Cut Warning)असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला आहे.

लॉक डाऊन काळातील वीजबिल माफीबाबत अनेक मोर्चे काढले, आंदोलनं झाली. मात्र आता शासनाने सक्तीने वसुली सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीने इशारा दिला आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी वीज बिलात सवलत देऊ, असे आश्वासन दिले होते. यानंतर बिल भरावेच लागेल, असे जाहीर केले. त्यामुळे आता आम्ही सुद्धा कोणत्याही स्थितीत वीजबिल भरणार नाही. सक्तीने वसूल करण्याचा प्रयत्न केल्यास आमच्याशी सामना करावा लागेल, असा इशारा शेट्टींनी दिला आहे.

लॉकडाऊन काळात सर्वच ठप्प असल्याने महावितरण कंपनीने सर्वच ग्राहकांचे अंदाजे रिडींग घेतले. त्यामुळे याचा मोठा भुर्दंड अनेकांना सोसावा लागला आहे. शिवाय अंदाजे घेतलेले रीडिंग ग्राहकांच्या माथ्यावर मारले गेले आहे. आशा वेळी एखादे पॅकेज देऊन वीजबिल माफ करावे अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटून याबाबत चर्चा केली असून निर्वाणीचा इशारा सुद्धा दिला असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER