जेएनयूच्या ‘त्या ‘४८ प्राध्यापकांना पाठविले कारणे दाखवा नोटीस

Show cause notices sent to JNU's 'those' 48 professors

नवी दिल्ली : राजधानी येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील(जेएनयू)च्या ४८ प्राध्यापकांना करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या ४८ प्राध्यपकांना आंदोलनात सहभागी झाल्याबाबत जेएनयूच्या व्यवस्थापन मंडळाने ही नोटीस पाठविली आहे.

३१ जुलै रोजी जेएनयूचे उप कुलगुरुंच्या नवीन कायद्यांचा विरोधात एक दिवसीय आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात ४८ प्राध्यापकांचा सहभाग होता. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली असून, हा निर्णय विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

विद्यापीठाकडून ४८ प्राध्यपकांना पाठविण्यात कारणे दाखवा नोटीसमध्ये लिहिले आहे की, जे आंदोलन करण्यात आले होते ते विद्यापीठाच्या मर्यादेच्या विरुद्ध, विद्यापीठाच्या नियम आणि अटींच्या विरोधात आहे. यामुळे आम्ही खूप विचलित झालो आहोत. कारण, शांततेच्या मार्गाने विरोध करण्याचा लोकशाहीत असणारा हक्क हे विद्यापीठ कायदा आणि वैधतेच्या दृष्टीने पाहत आहे,असे जेएनयूच्या प्राध्यापिका आयेशा किडवाई यांनी सांगितले.