शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात जल्लोष; शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा

Chhatrapati Shivaji Maharaj

मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९०वी जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साहाचं वातावरण असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आले आहे. शिवरायांची जन्मभूमी शिवनेरी गडासह राज्यभरात ठिकठिकाणी शिवजन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे.

किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवजयंतीचा उत्सव साजरा होणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील काही मंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. आदिवासी भागातील तेजुरच्या ठाकरवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी अनोख्या पद्धतीने मंत्रीमहोदयांचं स्वागत करणार आहेत. यावेळी १०१ विद्यार्थी आदिवासी डांगी नृत्यातून भगव्या झेंड्यांचं संचलन करणार आहेत.