‘कोणाचाही नाद करा, पण पवारसाहेबांचा नाद करू नका !’ धनंजय मुंडेंचा भाजप नेत्यांना इशारा

Sharad Pawar-Dhananjay Munde

पंढरपूर :- मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आज पंढरपुरात दाखल झाले. त्यांनी यावेळी विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला.

आजचा दिवस माझ्या आयुष्यात का यावा? पंढरपूरच्या पांडुरंगाला मी प्रश्न विचारतो. माझ्या जीवनातील सर्वांत  मोठी सभा नानांच्या हजेरीत पार पडली होती. त्या वेळीच मी संगितलं होतं, नाना हॅट्रिक करणार ते. नानांचं आणि माझं नातं हे वडील-मुलाचं होतं. मात्र मी आता आशीर्वाद द्यायला नाही तर भगीरथसाठी आशीर्वाद मागायला या ठिकाणी आलेलो आहे. भाजपने इथले  राजकारण खालच्या पातळीवर नेवून ठेवले आहे. पोटनिवडणूक लागल्यावर विरोधात उमेदवार देण्याचं पाप यांनी केलं. लाखोंच्या संख्येने कोरोनाचे पेशंट समोर येत आहेत. अशा परिस्थितीत ही निवडणूक लागायला नको होती. वारकरी संप्रदायात या गावाचं वेगळं स्थान आहे. त्यामुळे १७ तारखेला वळवळ करणाऱ्याला चांगलं रिंगण दाखवायचं आहे, असे म्हणत त्यांनी भावनिक आवाहनही केले.

यावेळी ते म्हणाले की, मी कच्च्या गुरूचा चेला नाही. कोणाचीही पावसात सभा झाली की यांना धडकी भरते. मी कासेगावच्या सभेत सांगितले होते, मायच्यान कोणाचाही नाद करा, पण पवारसाहेबांचा नाद करू नका. पण नाद केल्याशिवाय त्यांना गमत नाही. टीका  करायचे विरोधकांचे काम आहे. लोकशाहीचा आदर करणारे आम्ही कार्यकर्ते, आम्हाला लोकशाही शिकवता. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं पवारसाहेबांनी करून दाखवलं, असेही धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button