जिल्हापरिषदेत ठरल्याप्रमाणे खांदेपालट : ना. मुश्रीफ

Hassan Mushrif

कोल्हापूर : जिल्हापरिषदेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. सत्तासुत्र ठरले आहे. डिसेंबर महिन्यात पदांची खांदेपालट होणार आहे. मागील वर्षी सत्ता बदलताना जे ठरले आहे त्यानुसार होईल, असे सांगत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी जिल्हा परिषदेतील खांदेपालटाचे संकेत दिले आहेत.

वर्षभरापुर्वी सत्ता स्थापन करताना विद्यमान पदाधिकाऱ्यांना एक वर्षाचा कार्यकाल देण्याचे मान्य करण्यात आले होते. वर्षभरानंतर पदाधिकारी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबत विचारले असता मुश्रीफ यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गेली महिनाभर इच्छुकांकडून नेत्यांच्या भेटीगाठींना सुरुवात झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्याने पदाधिकारी बदलाच्या घडामोडी वेगाने होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता उलथवत गतवर्षी डिसेंबर महिन्यात महाविकास आघाडीने आपले झेंडा रोवला. या सत्ता बदलात मंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार पी. एन. पाटील, आमदार प्रकाश आबीटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील सरुडकर, उल्हास पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली. पदाधिकारी निवडतानाही मोठी कसरत करावी लागली. अनेक रुसवे फुगवे काढून ही सत्ता स्थापन झाली. वर्षभरानंतर सत्ता बदल करण्याचा निर्णय मागील सत्ता स्थापनेवेळीच घेण्यात आला आहे. दरम्यान काही पदाधिकाऱ्यांनी कोरोनामुळे मुदतवाढ मिळवण्यासाठी प्रयत्न चालवले होते. मात्र नेत्यांनी या मुतदवाढीस दाद दिलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER