नरेंद्र मोदी २०२४ ला पुन्हा पंतप्रधान असावेत का? पहा किती टक्के जनतेने दिला कौल

PM Modi

मुंबई : पंतप्रधान पदावर पुन्हा विराजमान झालेले नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या कारकिर्दीला दोन वर्षे पूर्ण झाले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) देशाने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भरवसा ठेऊन दुसऱ्यांचा सत्ता भाजपाच्या हाती दिली. यापार्श्वभूमीवर एका लोकमतने जनमताचा कौल जाणून घेतला .

२०२४ मध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान असावेत, असं वाटतं का? असा प्रश्न वाचकांना केला होता. त्यावर ५२.५९ टक्के लोकांनी नकार दिला आहे आणि ४३.६१ टक्के लोकांना नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत असं वाटत आहे तर ३.८१ टक्के लोकांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदीच पंतप्रधान बनणार का?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे . यातच काही प्रमाणात विरोधकांनी आक्रमकपणे सरकारच्या धोरणांवर टीका करणं सुरू केले आहे. स्थानिक निवडणुकींमध्ये भाजपाला फटका बसत आहे. पश्चिम बंगालमध्ये साम-दाम-दंड भेद वापरूनही भाजपाच्या पदरी निराशा पडली आहे. यातच मोदी सरकारच्या कारकिर्दीला आज ७ वर्ष पूर्ण होत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button