…मग जय श्रीरामच्या घोषणा पाकिस्तानात द्यायच्या का? अमित शहांचा ममता बॅनर्जींना प्रश्न

कूचबिहार : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी राजकीय पटलावर बऱ्याच घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे. याच दरम्यान, गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी कूचबिहार येथे एक सभा घेतली. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर जोरदार टीका केली.

पश्चिम बंगालमध्ये सर्व वातावरण असं करण्यात आलं आहे, जणू इथं जय श्रीराम बोलणं म्हणजे एक गुन्हाच झाला आहे. मात्र बंगाल विधानसभेच्या निवडणुका संपेपर्यंत ममता बॅनर्जीदेखील ‘जय श्रीराम’ म्हणू लागतील. ‘फक्त एका समुदायाची मतं प्राप्त मिळवण्यासाठी ममता असं वागत आहेत. बंगालमध्ये जय श्रीरामची घोषणा देणार नाही तर मग पाकिस्तानमध्ये ती घोषणा द्यायची का?’ असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला. जय श्रीराम ही घोषणा देणं म्हणजे जणू गुन्हा आहे, असं वातावरण त्यांनी (ममता बॅनर्जी) निर्माण केलं आहे. त्यांना ही घोषणा अपमानास्पद का वाटते, याची आम्हाला माहिती हवी आहे, अशी टीका शहा यांनी यावेळी केली.

ममता बॅनर्जी गुंडांच्या जीवावर बंगालची निवडणूक जिंकतात. तृणमूल काँग्रेस पक्षाचे ‘गुंड’ इथं भाजपची सत्ता येण्यापासून रोखू शकणार नाही, असं म्हणत परिवर्तन रॅली ही मुख्यमंत्री किंवा सत्ता बदलण्यासाठी नसून घुसखोरी रोखण्यासाठीच आहे, असं ठाम वक्तव्य केलं. परिवर्तन रॅलीच्या माध्यमातून आत्या-भाचा म्हणजेच ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांचा भ्रष्टाचार संपुष्टात आणणं हे अमित शहांचं मुख्य लक्ष्य आहे. देशातील गरीब आणि गरजवंतांसाठी मोदी सरकारनं ११५ योजना सुरू केल्या आहेत. ममतादीदींनी या योजना अडवल्या आहेत. मोदी सरकार गरिबांसाठी काम करत आहे. तर ममतादीदी या फक्त आपल्या भाच्याला मुख्यमंत्री करण्यासाठी काम करत आहेत, असा आरोपही शहा यांनी या भाषणात केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER