दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करून पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतला पाहिजे – रामदास आठवले

ramdas-athawale

मुंबई: पाकव्याप्त काश्मीरमधील जैशचा दहशतवादी अड्डा भारतीय वायू दलाने एयरस्ट्राईकने उध्वस्त करून पुलवामादहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. आता पाकव्याप्त काश्मीर मध्ये असलेले सर्व दहशतवादी संघटनांची अड्डे उध्वस्तकरून भारताने पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात घ्यावा अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीयसामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.

पाकिस्तानवर हवाई हल्ला करून जबरदस्त एयरस्ट्राईक केल्याबद्दल भारतीय वायुदलाच्या शूर जवानांचे ना रामदासआठवले यांनी अभिनंदन केले आहे. आपल्या भारतीय सैन्यातील जवान अतुलनीय शूर असून आपल्या जवानांचाआम्हाला अभिमान असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.

हि बातमी पण वाचा : पाकिस्तानला युद्धाची खुमखुमी; तेल कंपन्यांच्या प्रमुखांसोबत बोलावली बैठक

 

काश्मीर मधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलावर दहशवादी हल्ला झाल्यानंतर सर्व देशभरआतंकवाद्यांविरुद्ध संतापाची निषेधाची लाट उसळली होती.आतंकवाद्यांचे अड्डे उध्वस्त करून हल्ल्याचा बदला घेतला पाहिजे .

पाकिस्तानशी आरपारची लढाई लढावी; सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तनाला धडा शिकविण्याची जनभावनाव्यक्त झाली होती. त्यामुळे आज पहाटे भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मीरमधील जैश च्या आतंकवादी आड्डयांवरहल्ला करून ते अड्डे उध्वस्त केले. त्याबद्दल ना रामदास आठवले यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पाकव्याप्त काश्मीर मध्ये अनेक दहशतवादी संघटनांचे अड्डे आहेत ते सर्व अड्डे उध्वस्त करून पाकव्याप्त काश्मीरभारताने ताब्यात घेतला पाहिजे असे मत ना रामदास आठवले यांनी आज व्यक्त केले.

हि बातमी पण वाचा : भारताचा एक पायलट बेपत्ता – परराष्ट्र मंत्रालय