देवेंद्र फडणवीसांचा सन्मान ठेवायलाच हवा, रोहित पवारांनी कार्यकर्त्याला खडसावले

Rohit Pawar - Devendra Fadnavis

मुंबई : विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली असून, मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार घेत आहेत. यादरम्यान त्यांच्यावर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी देवेंद्र फडणवीस यांना प्लाझ्मा थेरपीचा एक डोस देण्यात आला होता. यानंतरही आजही त्यांना आणखी एक डोस देण्यात आल्याचे सांगितले जाते. आता त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, राजकीय विधानातून नेहमीच देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करत असलेले कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी यावेळी मात्र फडणवीसांना टीका करणाऱ्या कार्यकर्त्याला चांगलेच खडसावले आहे. देवेंद्र जी फडणवीस यांच्याकडं जबाबदार पद आहे आणि आरोग्याच्या बाबतीत कुणी खोटं बोलत नसतं, त्यामुळं त्यांच्याबाबत असं बोलणं योग्य नाही, त्यांचा आपण सन्मान ठेवलाच पाहिजे. दुसरा मुद्दा मात्र खरा आहे. बिहारमध्ये भाजप (BJP) हरणार असं अनेकजण बोलतायेत आणि अनेकजण ते कबूलही करतायेत. असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्याला खडे बोल सुनावले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER