३० लाख विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या लेखी परिक्षेसाठी जीव धोक्यात घालावा का?

Students - Maharastra Today

एप्रिल महिना सुरु झालाय. दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातच दहावी, बारावी बोर्डाच्या परिक्षा पार पडतात. यंदा मात्र कोरोनानं ह्या परिक्षा पुढं ढकलल्या गेल्यात. कोरोनाची दुसरी सुरु आहे. राज्यभरात जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. अशी भीषण परिस्थीती असताना राज्य सरकारनं परिक्षांबाबत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

राज्यातले सुमारे तीस लाख विद्यार्थी दहावी बोर्डाच्या परिक्षेला यंदाच्या वर्षी सामोरे जाणार आहेत. आरोग्य यंत्रणांवर दबाव आहे. लसीकरण आणि कोरोनावर उपाय अशा दोन्ही आघाड्यांवर ते लढत आहेत. अशात तीस लाख विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाशी खेळ नक, परिक्षा घरातून बाहेर पडून देण्याऐवजी इतर उपायांचा विचार केला जावा अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

“आम्हीच का जीव धोक्यात घालायचा?”

“राजभरात कडक लॉकडाऊन सुरु आहे. कडक निर्बंध लादण्यात आलेत. सगळीकडं इतकी भीषण परिस्थीती आहे. मग आम्हीच का जीव धोक्यात घालावा?” असा सवाल विद्यार्थी उपस्थीत करत आहेत. दहावीच्या परिक्षा २९ एप्रिल ते २१ मे दरम्यान तर बारावीच्या परिक्षा २३ एप्रिल ते २० मे पर्यंत होणार आहेत. राज्यातील वाढत्या कोरोनाची परिस्थीती बघता दहावी, बारावीच्या परिक्षांबद्दल सरकारनं गंभीरतेनं विचार करावा असा पालाकांचाही सुर आहे.

कोरोनाचा नवा विषाणू ‘सुपर स्प्रेडर’ म्हणून ओळखला जातो. म्हणजे कमी कालावधीत जास्तीजास्त लोकांना कोरोनाबाधित करण्याची त्याची ताकद आहे. लसीकरण मंद वेगात सुरु आहे. अशा परिस्थीतीत विद्यार्थ्यीं तणावात असणं सहाजिक आहे. दरम्यानं याच तणावात विद्यार्थी परिक्षेला सामोरे गेले तर त्यांच्या लिखाणावर परिणाम होऊ शकतो असं ही बोललं जातय. कोरोनाग्रस्तांचे आकडे रोज नवे उच्चांक गाठत आहेत. त्यामुळं ३० लाख विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विषय लक्षात घेऊन सरकारनं मधला मार्ग काढावा अशी मागणी केली जातीये.

शिक्षण मंत्री म्हणतात

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या विषयावर मत मांडलंय. विद्यार्थ्यांना कोरोना झाला तर जबाबदारी कोणाची हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या. “आपण सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. सरकार म्हणून मुलांची सुरक्षित परीक्षा घेण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे.”

ऑनलाइन परिक्षा घेणं कठिण

बोर्डाच्या परिक्षा ऑनलाइन पद्धीतीनं घेण्यात याव्यात अशी मागणी जोर धरतीये. घराबाहेर पडून परिक्षा देण्यापेक्षा घरीच ऑनलाइन पद्धतीने पेपर देणं योग्य राहिल असं पालक म्हणतायेत. यावर शिक्षण मंत्री गायकवाड म्हणाल्या, “बोर्डाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३० लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ऑनलाईन परीक्षेपेक्षा सर्व मुलांचा आम्ही विचार केला. गावातल्या मुलांचं परीक्षा देताना इंटरनेट कनेक्शन गेलं तर काय करणार? सी.बी.एस.ई., आय.सी.एस.ई. ही बोर्डही त्याच काळात परीक्षा घेत आहेत. आम्ही परीक्षा घेत असलो तरी आमची प्राथमिकता विद्यार्थ्यांचं आरोग्य आहे.”
ऑनलाइन परिक्षा घेणं कठिण असल्याचा त्यांचा सुर होता.

लेखी परिक्षेला अन्य पर्याय दिसत नाही.

परिक्षेंविषयी शिक्षण क्षेत्रातील तज्ञ लोकांची मत लेखी परिक्षा घेण्यात यावीत अशीच आहेत. दहावी बारावीच्या लेखी परीक्षेचे शालेय शिक्षणातले स्थान आणि विशिष्ट महत्त्व लक्षात घेता लेखी परीक्षेला अन्य पर्याय समोर दिसत नाहीत. अमूक नियोजन आणि ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षांचा आग्रह धरणे उपयोगाचे होणार नाही. आणखी काही दिवस परीक्षा लांबणीवर टाकण्याची गरज आहे. निदान अशा असाधारण काळात तरी पालक आणि यंत्रणांनी ‘परीक्षाकेंद्री मानसिकतेतून’ बाहेर पडून शिक्षणाचा विचार करायची गरज आहे. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे समुपदेशन फार आवश्यक झाले आहे. त्यासाठी तशी व्यवस्था उभी करायची गरज निर्माण झाली आहे. असा त्यांच्यातून सुर दिसतोय.

दहावी बारावीच्या शैक्षणिक वर्षांइतकचं विद्यार्थ्यांच आरोग्यही महत्त्वाचं आहे. अशा कठिण प्रसंगातून सरकार काय सुवर्णमध्य साधेल या कडं महाराष्ट्राच लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button