माझ्या घरावर गोळ्या झाडल्या – कंगनाचा आरोप

Kangana Ranaut

मनाली : काही अज्ञात लोकांनी माझ्या घरावर गोळीबार केला, असा आरोप अभिनेत्री कंगना रनौत(Kangana Ranaut) हिने केला आहे. या प्रकरणी तिने पोलिसात तक्रार केली असून चौकशी सुरू आहे.

कंगनाने एका वृत्तपत्राला सांगितले की, “रात्री ११.३०च्या दरम्यान मला फटाक्यांसारखा आवाज आला. आधी मी दुर्लक्ष केले. पण पुन्हा एकदा तसाच आवाज आला. यावेळी तो आवाज फटाक्यांसारखा नव्हता तर बंदुकीतून सुटलेल्या गोळीसारखा होता. मी वॉचमनला बोलावले. त्याने देखील आवाज ऐकला पण तो आवाज नेमका कसला होता हे त्याला सांगता आले नाही. मी पोलिसांकडे तक्रार केली. मी सध्या राजकिय, सामाजिक आणि बॉलिवूडमधील घराणेशाहीबाबत टीका करते आहे त्यामुळे माझं मत न पटणाऱ्यांनी मला घाबरवण्यासाठी हा गोळीबार केला असावा असे मला वाटते पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.”

यापूर्वी कंगना अभिनेत्री आलिया भट्टमुळे(Alia Bhatt) चर्चेत होती. आलियाच्या वाढदिवसाचे निमित्त साधून तिने बॉलिवूडमधील(Bollywood) स्टार किड्सवर टीका केली होती. आपल्या टीमच्या ट्विटर हँडलवरुन आलियाला शुभेच्छा देणाऱ्या कलाकारांबाबत संताप व्यक्त केला होता. “हा आहे खरा खेळ. यांच्यापैकी एकाही स्टारकिड्सने सुशांतसाठी न्याय मागितला नाही. अन् आता त्या मूर्ख मुलीच्या फोटोसाठी पूर्ण इंडस्ट्री एकवटली आहे. व्वा रे व्वा” असे ट्विट करुन कंगनाने संताप व्यक्त केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER