दम काढणारा दमा!

Asthma

नाकातून वायु आत जाणे व बाहेर येणे यास श्वासोच्छ्‌वास म्हणतात परंतु या श्वासोच्छ्‌वासाची नेहमीची गति वाढली की श्वास किंवा दमा (Asthma) लागला असे म्हणतो. अनेक कारणांनी वाढलेला कफ फुफ्फुसांमधे साचला की श्वासवाहिन्या पूर्णपणे वायुने भरत नाहीत. म्हणून श्वासोच्छ्वास जलद करावे लागते. डोक बरगड्यामधे जकडल्याप्रमाणे वाटते. घश्यात घुरघुर आवाज तहान लागणे घसा शुष्क असणे डोळे ताठरणे रात्री झोपेत गुदमरल्याप्रमाणे वाटून एकदम जाग येते व श्वास घ्यायला त्रास होतो. आडवे निजवत नाही अतिशय उकडल्याप्रमाणे वाटते हवेच्या जागी बसल्यास वा पंख्याची हवा घेतल्यास बरे वाटते. कफ सुटला की थोडे बरे वाटते. रात्रीपेक्षा उन्हात, दिवसा बरे वाटते. अशी लक्षणे दमेकरी अनुभवतो.

थंड हवामान धूळीचे प्रमाण वाढले की दम्याचा त्रास बळावतो. कफ वाढल्याने, ढगाळ वातावरण, हवेत गारठा वाढल्यास, पावसाळ्याच्या सुरवातीला, कफ वाढविणारे पदार्थ थंड पेय या कारणांमुळे दम्याचा आजार वाढतो. आईवडीलांपैकी कुणाला दम्याचा त्रास असल्यास कित्येक लोकांना जन्मापासून त्रास असतो.

दम्याचा औषधीउपचार पंचकर्म च्यवनप्राश तज्ज्ञ वैद्याच्या सल्ल्याने नक्कीच करावे. परंतु पथ्य पाळणे दम्याच्या रुग्णाकरिता खूप महत्त्वाचे ठरते. गार वारा, एसीमधे सतत राहणे टाळावे. थंड हवामानात गरम कपडे घालावे. अति व्यायाम दंड बैठकासारखे व्यायाम टाळावे.

  • तुळस दालचिनी सुंठ काढा खडीसाखरेसह सकाळ प्रहरी घेणे कफ कमी करतो.
  • जुने धान्य वापरावे. नवीन गहू तांदूळ डाळी कफ वाढविणाऱ्या असतात. त्यामुळे सर्व धान्य १ वर्ष जुने वापरावे.
  • बाजरी ज्वारीची यव भाकरी आहारात घ्यावी.
  • पडवळ, कारले, दूधीभोपळा, मेथी, तांदूळजा, सुरण, वांगी या भाज्या मसालेदार न करता घ्याव्या.
  • लसूण पुदिना आले हिंग तूप सुंठ मिरे आहारात घ्यावे.
  • तापवलेले पाणीच प्यावे. थंड पाणी पिऊ नये.
  • पोट तडीस जाईल एवढे जेवू नये. भूक लागल्यावरच जेवावे.
  • साळीच्या लाह्या ज्वारीच्या राजगिरा लाह्या मधल्या वेळेत खाण्याकरीता घ्याव्यात.
  • श्रीखंड बासुंदी दूधाचे पदार्थ कोल्ड्रींक थंड पेय कलिंगड केळी काकडी सारखे पदार्थ घेऊ नयेत.
  • जेवल्यावर मध पाणी घेऊ शकतो.

 

 

 

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER