रत्नागिरी जिल्ह्यात कामगारांचा तुटवडा

Shortage of workers in Ratnagiri district

रत्नागिरी/प्रतिनिधी :- लॉकडाऊनमुळे सध्या अनेक उद्योग बंद असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील परराज्यातील कामगार आपल्या गावी गेले आहेत. परिणामी जिल्ह्यात कामगारांचा तुटवडा भासत आहे.

शासनाने आता काही अटींवर उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी अनेक कामांसाठी कामगारच मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात बांधकामापासून अनेक प्रकारच्या कामांसाठी कर्नाटक, उत्तर प्रदेश, झारखंड आदी भागातील कामगार आहेत. विविध ठिकाणी हे कामगार ठेकेदारांच्यामार्फत काम करतात. गेल्या काही दिवसांत हजारो कामगार आपल्या गावी परतल्याने कोकण रेल्वेवर येणाऱ्या धान्य व खताच्या गाड्यांमधून सामान उतरवण्यासाठी हे कामगार नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. या भागातील कामगार विशेषतः मेहनतीची व जड कामे करत होते. हे कामगारच नसल्याने आता ठेकेदारांनादेखील माल उतरविण्यासाठी कामगारांची जुळवाजुळव करणे कठीण झाले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER