रेमेडिसिव्हरची मागणी वाढल्यानेच तुटवडा : हसन मुश्रीफ

Hassan Mushrif

कोल्हापूर : कोरोनावर (Corona) परिणामकारक रेमेडिसिव्हर इंजेक्शन (Remdesivir injection) सध्या मागणी प्रचंड वाढली असून शासनाच्या खरेदी प्रक्रिया या वेळेत होत नाही. त्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात येऊ नये, म्हणून जिल्हा प्रशासनाने, खाजगी दवाखान्यांनी रेमेडिसिव्हर व इतर औषधे स्वतः खरेदी करावीत, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी रविवारी पत्रकाव्दारे केले.

कोरोना रुग्णांना रेमेडिसिव्हर इंजेक्शन मोफत देण्याचा निर्णय राज्यांमध्ये प्रथम कोल्हापूरला देण्याचा निर्णय आम्ही तिन्ही मंत्र्यांनी घेतला. टंचाईच्या काळातही पुरवठा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सध्या विकत घेतलेल्या औषधांच्या बिलाचे शासनाकडून ऑडिट होईल व रुग्णांना ते द्यावे लागेल. औषधांचा पुरवठा सुरळीत झाल्‍यानंतर पूर्वी प्रमाणे देण्याचा मानस आहे. रुग्णांची हेळसांड होऊ नये, म्हणून खाजगी दवाखान्यांनी दक्षता घ्यावी, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER