औरंगाबादमध्ये १ जूननंतर उघडू दुकाने; खासदाराने दिला इशारा

Uddhav Thackeray - imtiaz jaleel - Maharashtra Today

औरंगाबाद :- राज्यात १ जूननंतर लॉकडाऊन कायम राहणार की नाही यावरून सध्या चर्चा सुरू आहे. या संदर्भात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी इशारा दिला आहे की, लॉकडाऊन (Lockdown) उठवला नाही तर १ जूननंतर दुकाने सुरू करणार.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणालेत की, कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन शिथिल  करण्याची गरज आहे. १ जूननंतर आम्ही लॉकडाऊनचे पालन करणार नाही, असे औरंगाबादची जनता सांगते आहे. त्यांच्या बोलण्यात लॉजिक आहे. दोन महिन्यांपूर्वी शहरात कोरोनाच्या रुग्णांचा (Corona Patient) आकडा १८०० वर गेला होता, आज आपण १२० वर आलो आहोत. ग्रामीण भागात २०० च्या आसपास आलो आहोत. लोकांनी इतके सहकार्य दिले, कष्ट सहन करून आकडेवारी कमी केली. आता पुन्हा पंतप्रधान, मुख्यमंत्री टीव्हीवर येऊन आम्हाला ज्ञान पाजळणार असतील तर त्यांचे कोणीही ऐकणार नाही. २७ वर्षांच्या एका रिक्षाचालकाने आत्महत्या केली याची जबाबदारी कोण घेणार आहे? मी मुख्यमंत्री किंवा जिल्हाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करू का?

पंतप्रधानांचे तर आम्ही २०० टक्के ऐकणार नाही. या देशात त्यांचे भक्तही ऐकणार नाही. कारण जेव्हा देशात लाखोंच्या संख्येने लोक रडत होते तेव्हा आदरणीय पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) जाऊन ‘दीदी, ओ दीदी’ करत होते. आता लोक त्यांना ‘दादा, गप्प बस दादा’ म्हणणार आहेत. स्वत: पंतप्रधानांनी ती वेळ आणली आहे. आता टीव्हीवर येऊन रडण्याचं कारण नाही. आम्हाला माहिती आहे कोण कसा अभिनय करते. लोकांना सांभाळण्याची वेळ होती तेव्हा जाऊन प्रचार करत होतात, लाखोंच्या संख्येने गर्दी गोळा करत होतात आणि आता ज्ञान पाजळत आहात, असा संताप त्यांनी  व्यक्त केला. पंतप्रधानांना सांगा की, औरंगाबाद नावाचे एक शहर आहे जिथे तुमच्या निर्णयाचे पालन करणार नाही असे ठरवले आहे, असे जलील म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button