इंडियाज बेस्ट डान्सरची शूटिंग पोस्टपोन, रिप्लेस नाही होणार कोरोना पॉजिटीव्ह मलायका

India's best Dancer - Malaika Arora

रविवारी अर्जुन कपूरची (Arjun Kapoor) कोरोना (Corona) पॉझिटिव्ह असल्याची बातमी आली.त्यानंतर थोड्याच वेळात त्याची गर्लफ्रेंड मलायका अरोडा (Malaika Arora) देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे बातमी आली. दोघेही घरात होम क्वारनटीन मध्ये आहे. चाहते दोघेही लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करत आहेत. इतक्यात मलायका रिऍलिटी शो ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ला जज करत होती.

मलायका कोविड पॉझिटिव्ह (COVID Positive) असल्याचे समजल्यानंतर शोचे शूटिंग पुढे ढकलण्यात आल्याची बातमी आली आहे. सर्व स्पर्धक आणि क्रू सदस्यांनी त्यांची कोरोना टेस्ट केले आहे. तरी अहवाल येणे बाकी आहे. सूत्रानुसार, पुढील सूचना येईपर्यंत या कार्यक्रमाचे शूटिंग थांबविण्यात आले आहे. स्पर्धक आणि क्रू मेंबर्सचे चाचणी अहवालांची प्रतीक्षा आहे. लवकरच नवीन शूटिंग तारखेची घोषणा केली जाईल.

मलायकाला रिप्लेस करणार नाही, अशी खात्रीही सूत्रांनी निर्मात्यांना दिली आहे. पूर्ण बरे झाल्यानंतर मलायका सेटवर परत येईल. २-३ भागांसाठी दुसर्‍या जजची नेमणूक करणे अवघड होईल. कमी वेळेकरिता कोणताही सेलिब्रेटी शोला जज करण्यास तयार होणार नाही. त्यामुळे काही दिवस मलायकाशिवाय शुटिंग केले जाईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER