अमेरिकेतून अ‌ॅक्शन क्रू येऊ शकत नसल्याने रखडले कमल हसनच्या ‘इंडियन २’ चे शूटिंग

Maharashtra Today

कमल हसन (Kamal Hasan) त्याच्या सिनेमात मेकअप करून वेगवेगळ्या भूमिका साकारण्यात वाकबगार आहे. अगदी ‘अप्पू राजा’पासून ‘इंडियन’ ‘चाची ४२०’, ‘विश्वरूपम’पर्यंत अनेक सिनेमांची नावे यात घेता येतील. कमल हसनने १९९६ मध्ये ‘इंडियन’ सिनेमा तयार केला होता. यात त्याने एका स्वातंत्र्य सैनिकाची भूमिका साकारली होती. सिनेमाच्या शेवटी तो दूर कुठे तरी असलेला दाखवलेला होता. तेव्हाच इंडियन २ येईल असे म्हटले जात होते. पण कमल हसनने ‘इंडियन २’ सुरु करण्याऐवजी दुसरेच सिनेमे तयार केले. या काळात त्याने ‘विश्वरूप’मचेही दोन भाग तयार केले. अखेर गेल्या वर्षी त्याने ‘इंडियन २’ ला सुरुवात केली. हा त्याचा आतापर्यंतचा सगळ्यात खर्चिक सिनेमा आहे असे सांगितले जात आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शंकरच (Shankar) करीत आहे. १९९६ नंतर प्रथमच जवळ जवळ २० वर्षांनी कमल हसन आणि शंकर या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत. या सिनेमाचे शूटिंग सध्या अमेरिकेतून अॅक्शन क्रू येऊ शकत नसल्याने थांबले आहे. ही माहिती सिनेमाची नायिका काजल अग्रवालने दिली.

कमल हसनने गेल्या वर्षी या सिनेमाचे शूटिंग चेन्नईत सुरु केले होते. चेन्नईतील ईव्हीपी स्टुडियोत शूटिंग सुरु असताना एक क्रेन पडली आणि यात तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता आणि १५ जण जखमी झाले होते. ही दुर्घटना घडली तेव्हा सेटवर कमल हसन आणि काजल अग्रवालही उपस्थित होते. सुदैवानेच ते या दुर्घटनेत वाचले होते. त्यानंतर सिनेमाचे शूटिंग बंद करण्यात आले. त्यानंतर कोरोना (Corona) आल्याने सिनेमाचे शूटिंग सुरुच होऊ शकले नाही. आता अनलॉक झाले असले तरी इंडियन २ चे शूटिंग सुरु होऊ शकलेले नाही.

काजल अग्रवाल सध्या तिच्या नव्या तेलुगु ‘मोसागल्लू’ सिनेमाची पब्लिसिटी करीत आहे. यावेळेस तिला ‘इंडियन २’ च्या शूटिंगबाबत विचारले असता तिने सांगितले, या सिनेमात खूप अॅक्शन असल्याने हॉलिवूडमधून अॅक्शन क्रू मागवून अॅक्शनचे शूटिंग केले जात आहे. मात्र सध्या कोरोना असल्याने आणि अमेरिकेतून क्रू मेंबर येऊ शकत नसल्याने सिनेमाचे शूटिंग बंद आहे. अमेरिकेतून क्रू मेंबर्सना भारतात येण्याची परवानगी मिळाली की लगेचच शूटिंगला सुरुवात केली जाईल असेही काजलने सांगितले.

ही बातमी पण वाचा : साउथच्या सुपरहिट अन्नियनच्या रिमेकमध्ये रणवीर सिंह दिसणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER