३ एप्रिलपासून सुरु होणार ‘हीरोपंती २’ चे शूटिंग

Maharashtra Today

टायगर श्रॉफ (Tiger Shroff) सध्या त्याच्या नव्या हीरोपंती २ (Heropanti 2) सिनेमात पूर्ण गुंगून गेलेला आहे. या सिनेमाचे प्री प्रोडक्शन सुरु असून लवकरच याचे शूटिंग मुंबईत सुरु केले जाणार आहे. हीरोपंती हा टायगरचा बॉलिवूडमधील(Bollywood) एंट्रीचा सिनेमा होता. २०१४ मध्ये आलेला हा सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर आता ७ वर्षानंतर याचा सिक्वेल हीरोपंती २ तयार होत आहे. टायगर श्रॉफ या सिनेमाबाबत प्रचंड उत्साहित असून पहिल्या सिनेमाप्रमाणेच हा सिनेमाही सुपरहिट व्हावा असा त्याचा प्रयत्न आहे. सिनेमाचे पहिले पोस्टरही टायगरने सोशल मीडियावर शेअर केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हीरोपंती २ चे शूटिंग ३ एप्रिलपासून मुंबईत सुरु केले जाणार आहे.

सिनेमाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘हीरोपंती २’ चे पहिले शूटिंग शेड्यूल मुंबईत आयोजित करण्यात आलेले आहे. या शेड्यूलमध्ये अॅक्शन सिक्वेन्स शूट केले जाणार आहेत. कोरोनाची लाट कमी होत असल्याचे दिसत असल्यानेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शूटिंगचे शेड्यूल तयार करण्यात आले होते. मात्र आता कोरोनाची लाट पुन्हा मोठी होऊ लागल्याने आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण होत असल्याचे दिसत असल्याने या शूटिंग शेड्यूलचे दिवस कमी करण्यावर विचार सुरु करण्यात आला आहे. ३ एप्रिलला मुंबईत कोरोनाचे नियम पाळून शूटिंग सुरु केले जाईल. त्यानंतर परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल आणि शूटिंगचे स्थळ बदलले जाईल अशी माहितीही सूत्रांनी दिली.

दिग्दर्शक अहमदसोबत टायगर श्रॉफचा हा तिसरा सिनेमा आहे. यापूर्वी त्याने ‘बागी २’ आणि ‘बागी ३’ हे सिनेमे केले होते आणि आता ‘हीरोपंती २’ करीत आहे. या सिनेमाला संगीत देण्यासाठी प्रख्यात संगीतकार ए. आर. रहमान यांना साईन करण्यात आल्याची माहिती आम्ही तुम्हाला दिलीच होती. ए. आर. रहमानने संगीतावर काम सुरु केले असून सिनेमात पाच ते सहा गाणी असतील असे सांगितले जात आहे. हा सिनेमा ३डिसेंबर २०२१ रोजी संपूर्ण देशभरात रिलीज केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER