बंटी और बबली 2 चे शूटिंग पूर्ण

bunty aur babli 2

2005 मध्ये आलेल्या अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जीच्या यशस्वी बंटी और बबलीचा दुसऱ्या भागाचे बंटी और बबली 2 चे शूटिंग नुकतेच पूर्ण झाल्याची माहिती यशराज प्रोडक्शनने ट्विट करून दिली आहे. नव्या बंटी और बबलीमध्ये अभिषेक बच्चनची भूमिका सैफ अली करीत असून एक नवी जोडी सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी तरुण बंटी आणि बबलीची भूमिका साकारीत असल्याचे समजते.  खरे तर हा चित्रपट 26 जूनला प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन झाला आणि सगळे शूटिंग मार्चपासून बंद झाल्याने चित्रपटाचे उर्वरित शूटिंग काही होऊ शकले नव्हते.

त्यामुळे चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित होऊ शकला नव्हता. केंद्र सरकारने शूटिंगला परवानगी देताच यशराजने चित्रपटाचे उरलेले शूटिंगची तयारी केली. सगळ्या कलाकारांची डेट घेऊन यशराजने गाण्याचे आणि काही उरलेल्या सीन्सचे शूटिंग यशराजने आपल्या स्टुडियोत पूर्ण केले आहे. कोरोनाची भिती असल्याने  स्टूडियोत सगळ्या प्रकारची काळजी घेण्यात आली होती. सगळ्यांचे हात सतत सॅनिटाईझ केले जात होते तसेच संपूर्ण क्रू पीई किट घालून सेटवर वावरत होता. एवढेच नव्हे तर शूटिंग सुरु करण्यापूर्वी संपूर्ण क्रूला 14 दिवस घरी क्वारंटाईन करण्यात आले होते.

सेटवर आल्यानंतर सगळ्यांचे तापमानही चेक करण्यात आले होते. याशिवाय सेटवर डॉक्टरांची एक टीमही तयार ठेवण्यात आली होती अशी माहिती यशराजमधील सूत्रांनी दिली. सैफ आणि राणी मुखर्जीने यापूर्वी हम तुम, ता रा रम पम आणि थोडा प्यार थोडा मॅजिक चित्रपटांमध्ये काम केले असून ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. बंटी बबली 2 च्या दिग्दर्शनाची जबाबदारी वरुण शर्माने सांभाळली  आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER