धक्कादायक : गोकुळ शुगरचे चेअरमन शिंदे यांचा मृतदेह आढळला

Bhagwan Dattatraya Shinde - Gokul Sugar

सोलापूर : धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगरचे (Gokul Sugar) चेअरमन भगवान दत्तात्रय शिंदे (Bhagwan Dattatraya Shinde) यांचा मृतदेह आज  सकाळी मोदी स्मशानभूमीलगत असलेल्या रुळावर आढळून आला. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गोकुळ शुगरची उभारणी म्हेत्रे आणि शिंदे परिवाराने 2008 मध्ये केली आणि आज ही कंपनी नावारूपास आली आहे. मात्र गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये शेतकऱ्यांनी शिंदे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले होते गोकुळ शुगरने आमचा ऊस विकत घेतला मात्र त्याचा पैसा दिलाच नाही असा आक्रोश ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केला होता. त्यावेळी गोकुळ शुगरची अब्रू चव्हाट्यावर आली होती.

भगवान शिंदे हे आज सकाळी नेहमीप्रमाणे पहाटे फिरण्यासाठी गेले होते. उशिरापर्यंत ती घरीच परतले नाहीत, त्यामुळे कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, एक  मृतदेह मोदी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पुलावरून खाली पडल्याने छिन्ह विच्छिन्न अवस्थेत पडल्याची माहिती रेखें पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेतला आणि रेल्वे हॉस्पिटलला घेऊन गेले तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली आहे. नातलगांनी शोधाशोध केल्यानंतर सकाळी नऊ वाजता शासकीय रुग्णालयात अनोळखी मृतदेह आल्याची माहिती मिळाली, त्यानंतर हा मृतदेह भगवान शिंदे यांचा असल्याची खात्री पटली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER