धक्कादायक : दहावीची मुलगी गर्भवती; महाराष्ट्रात घडला प्रकार

मुंबई :- दहाव्या वर्गात शिकणारी एक विद्यार्थिनी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.  पालघर जिल्ह्यातील जव्हार आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत एका शाळेत हा प्रकार घडला. ही आदिवासी मुलींसाठीची आश्रमशाळा आहे. साकुर या गावामध्ये ही शाळा चालवली जाते.

या मुलीला शाळेतच उलट्या व रक्तस्राव सुरू झाल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी केली असता ही दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. तिच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी तिला जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असताना, तिला पुन्हा खूप रक्तस्राव सुरू झाला.  त्यामुळे तिची प्रकृती खालावत होती.  म्हणून गुरुवारी तिला नाशिक येथील जिल्हा  रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तेथे तिची पुन्हा वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यात ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तिच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. शासकीय आश्रमशाळा साकुर, ही पहिली ते बारावीपर्यंत निवासी कन्या शाळा आहे. मुलीच्या पालकांनी  गावातील  एका मुलासोबत तिचे प्रेमसंबंध होते, लॉकडाऊन काळात हा प्रकार घडल्याचे कबूल केले.

ही बातमी पण वाचा : युवकांनो — “त्या ” अंधार वाटेने जावू नका !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER