धक्कादायक : अंगावर आजार काढण्याच्या प्रमाणात वाढ

Fever

पुणे : कोरोना (Corona) साथीच्या भीतीने राज्यातील ग्रामीण भागात लोक आजार अंगावर काढत आहेत. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला आदी आजारांवर उपचार घेण्यास टाळाटाळ होत आहे. संपूर्ण आरोग्य यंत्रणा सध्या कोरोनाची तपासणी आणि उपाचारांत व्यस्त असल्याने साथीच्या अन्य आजारांकडे काहीसे दुर्लक्षच होत आहे. डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया आदी आजारांचे काही रुग्ण आढळत आहेत. मात्र ही साथ नाही. सहा महिन्यांत अन्य आजारांचे प्रमाणही कमी झालेय. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गावागावांत दक्षता घेतली गेली. औषध फवारणी झाली. सक्तीने मास्क वापरला जात आहेत.

प्रतिकारशक्ती वाढवणारा आहार घेत आहेत. त्याचा हा फायदा. आता हवामानातील अजब बदलांत काही ठिकाणी तापाचे रुग्ण आहेत. ठराविक औषधे आणि काळजी घेतल्यानंतर कोरोना बरा होतो, असा समज आहे. त्यामुळे कोरोनाची असणारे भीतीही लोकांमधून कमी झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात स्वाब तपासणीचे प्रमाण अत्यल्प आहे. वाढता खर्च हेही आरोग्य तपासणी टाळण्याचे एक कारण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER