धक्कादायक : कोल्हापुरात सहा महिन्यांत चौघांचा उपचाराअभावी मृत्यू

Death

कोल्हापूर :- कोल्हापूरसारख्या (kolhapur) सधन आणि सर्व सोयींनीयुक्त जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात चौघांचे वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. जिल्ह्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या धनगरवाड्यात पायाभूत सुविधा नसल्याने वैद्यकीय सेवा पोहोचू शकत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. धनगरवाडा (ता. राधानगरी) येथे प्रसूतीवेळी २६ वर्षीय महिला व नवजात अर्भकाचा मृत्यू झाला. या धनगरवाड्याला रस्ताच नसल्याने संबंधित महिलेवर वेळीच वैद्यकीय उपचार न झाल्यामुळे बाळ व मातेला जीव गमवावा लागला. गेल्या सहा महिन्यांत चौघांचा अशा प्रकारे उपचाराअभावी मृत्यू झाला आहे.

म्हासुर्ली पैकी मधला धनगरवाडा, पादुकाचा धनगरवाडा व रातंबीचा धनगरवाडा हे मुख्य रस्त्यापासून सुमारे सात किलोमीटर डोंगरात वसलेले आहेत. या धनगरवाड्यांकडे रहदारीसाठी रस्ताच अस्तित्वात नाही. या ठिकाणी जाण्यासाठी केवळ पायवाट आहे. त्यामुळे येथील रुग्णांना काट्याकुट्याच्या पायवाटेतून बाजल्यावरून उपचारासाठी नेण्यात येते. त्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली.

ही बातमी पण वाचा : विजमाफीबाबत शसनाकडून फसवणूक : मंगळवारी कोल्हापुरात मोर्चा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER