शॉकिंग! विज बिल 10 पट जास्त; व्यावसायिकाची हायकोर्टात याचिका

Electric Bill - High Court

मुंबई : लॉकडाऊनच्या तीन महिन्यात महावितरणचा माणूस विज बिलाचे रिंडिंग घेण्यास न आल्याने आता अनलॉकमध्ये तीन महिन्याचं सरसकट बिल देण्या येत आहे. त्यामुळे लॉकडाऊनंतर येणारे बिल वाजवीपेक्षा अधिक येत असल्याने ग्राहक संतापले आहेत.

त्यातच, मुलुंडमधील एका व्यवसायिकाला सरासरी बिलाच्या तब्बल 10 पट जास्त बिल कंपनीने पाठवले आहे. या विरोधात व्यवसायिकाने हायकोर्टात याचिका दाखल केली असून यातून सूट देण्याची मागणी केली आहे.

मार्च ते मे या कालावधीत अनेक ग्राहकांना वीज कंपन्यांनी वाढीव वीज बिले पाठवल्याच्या तक्रारी आहेत.

मुलुंड मधील व्यावसायिक रवींद्र देसाई यांना कंपनीने सरासरी बिलाच्या 10 पट जास्त बिल पाठवले आहे. या प्रकरणी ऍड्. विशाल सक्सेना यांच्या वतीने देसाई यांनी हायकोर्टात एमएसईडीसीएल, अदानी आणि टाटा पॉवर यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारने जूनच्या वीज बिलात सूट द्यावी, पैसे टप्प्या टप्प्याने भरण्याची मुदत द्यावी तसेच कोरोना संकटाच्या काळात भविष्यात अतिरिक्त वीज बिल कंपन्यांनी आकारू नये म्हणून राज्य सरकारने धोरण आखावे अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे लवकरच या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER