धक्कादायक : व्यसनाधीन बापाने मुलाला पाच लाखात तृतीपंथीला विकले

व्यसनाधीन बापाने मुलाला पाच लाखात तृतीपंथीला विकले

कोल्हापूर : व्यसनाधीन बापाने आपल्या दहा वर्षाच्या मुलालाच पाच लाख रुपये घेऊन एका तृतीयपंथीयास दत्तक दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान पोलिसांनी तपास सुरू केला असून संबंधित मुलाला जिल्हा बाल संरक्षण कक्ष विभागाने ताब्यात घेतले आहे. मुलाची रवानगी बालकल्याण संकुलात केली आहे.

याबाबत जिल्हा बाल संरक्षण कक्षकडुन मिळालेल्या माहितीनुसार,शहरातील शुक्रवार पेठ पोलिस चौकी परिसरात एक चांदी कारगीर पत्नी आणि दोन मुलांसह एका भाड्याने खोलीत राहतो. लॉकडाऊनमुळे (Lockdown) मे महिन्यात कारागिराची नोकरी गेल्याने, आजारी पत्नी व मुलांचे पोषण करणे शक्य नसल्याने त्याने दहा वर्षाच्या मोठ्या मुलास आपल्या जवळ ठेवून,पत्नीला लहान मुलासह पन्हाळा तालुक्यातील माजगाव येथे माहेरी पाठवून दिले. कारागिराची पत्नी आजारी असून मुलाची आजी नातवाला भेटण्यासाठी जावयाकडे विचारणा करत होती. जावई उडवाउडवीची उत्तर देऊन टाळाटाळ करत असताने आजीने मुलीच्या सासरवाडीत येऊन चौकशी केली असता जावयाने थोरल्या मुलाला एका तृतीयपंथीयाला दत्तक दिल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर आजीने दत्तक दिलेल्या तृतीयपंथीयाची भेट घेतली असता धक्कादायक माहीती पुढे आली. तृत्तीय पंथियाने मुलाच्या बदली पाच लाख रुपये जावयाला दिल्याचे सांगितले. पाच लाख परत द्या आणि नातवाला घेऊन जा असे त्याने सांगितले. त्यानंतर आजीने नातेवाईकासह पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांच्या सूचनेनुसार नातेवाईकांनी जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाईल्ड लाईन संस्थेकडे यासंदर्भात तक्रार केली. यानंतर पोलिसांच्या मदतीने तृतीयपंथींयाकडुन त्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन,त्याला बाल कल्याण संकुलात दाखल करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER