मासे पकडण्यासाठी ‘शॉक ट्रीटमेंट’ !

Shock treatment for catching fish.jpg

वॉशिंग्टन : अमेरिकेत आढळणाऱ्या एशियन कार्प या खादाड माशांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांना शॉक देऊन पकडतात !

एशियन कार्प हे मासे इतके खादाड असतात की ते ज्या तळ्यात राहतात त्यातील बहुतांश खाद्य एकटेच खाऊन टाकतात. केंटुकी राज्यातल्या बर्कले धरणात या माशांची संख्या वाढल्यानंतर त्यांनी धरणातील खाद्य सफाचट करून टाकले. दुसऱ्या जातीच्या माशांची उपासमार होऊ लागली; त्यांचे अस्तित्व धोक्यात आले. हे जैव विविधतेलाही घातक आहे. त्यामुळे एशियन कार्पची संख्या नियंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जगभरातील घुबड अभ्यासक दोन दिवस पुण्यात

विद्युत प्रवाह जोडलेले २ रॉड बोटीतून धरणाच्या पाण्यात टाकल्यानंतर शॉक लागल्याने मासे उद्या मारायला लागले आणि लगेच बेशुद्ध होऊन पडतात पण मरत नाहीत. मग पाण्यावरचे एशियन कार्प मासे गोळा करतात.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की १९७०च्या सुमारास अमेरिकेत एशियन कार्प माशांची बिजं आणली होती. पण बेसुमार वाढलेल्या या माशांमुळे स्थानिक प्रजाती धोक्यात आणल्या. त्यामुळे अमेरिकन सरकारला माशांना मारण्यासाठी ही ‘शॉक ट्रिटमेंट’ वापरावी लागली. मासेमारीची ही पद्धत थोडी नवीन असली तरी त्यात अनेक धोके आहेत, हे उल्लेखनीय.