शोएब मलिकने ते केले, जे विराट-रोहित देखील टी20 क्रिकेट मध्ये करू नाही शकले, पत्नी सानियाने केली अशी प्रशंसा

Sania Mirza - Shoaib Malik

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू शोएब मलिकने टी -२० क्रिकेटमध्ये असे काही केले आहे, जे यापूर्वी कोणत्याही आशियाई फलंदाजाने केले नाही. मलिक टी -२० क्रिकेटमध्ये (T-2o Cricket) १०,००० धावांचा टप्पा गाठणारा पहिला आशियाई आणि जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. ख्रिस गेल आणि कीरोन पोलार्ड यांनी त्याच्या आधी हा पराक्रम केला आहे. शनिवारी पाकिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या राष्ट्रीय टी -२० कप मध्ये मलिकने रावळपिंडीमध्ये खैबर पख्तून्ख्वासाठी ७६ धावा केल्या आणि टी -२० क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा टप्पा ओलांडला. मलिकची पत्नी आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) हिने त्याच्यासाठी खास ट्विट केले आहे.

सानिया मिर्झाने ट्विटरवर लिहिले की, “दीर्घायुष्य, संयम, परिश्रम, बलिदान आणि विश्वास शोएब मलिक, मला तुमचा अभिमान आहे.” आयसीसीने ट्विटरवर लिहिले की, ‘शोएब मलिक आज टी -२० क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा टप्पा पार करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्यापेक्षा फक्त ख्रिस गेल आणि केरॉन पोलार्डने अधिक धावा केल्या आहेत. आयसीसीचे हे ट्विट सानियाने शेअर करत ट्विट केले आहे. मात्र, शोएबला त्याचा संघाला जिंकवता आले नाही. त्याने ४४ चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ७४ धावा फटकावल्या.

या सामन्यात बलुचिस्तानने खैबर पख्तूनख्वाचा सहा गडी राखून पराभव केला. ३८ वर्षीय शोएबने २००५ मध्ये टी -२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आतापर्यंत ३९५ टी -२० सामने खेळले आहेत. यावेळी त्याने ३७.४१ च्या सरासरीने १०,०२७ धावा केल्या आहेत. या दरम्यान मलिकच्या फलंदाजीमधून ६२ अर्धशतके निघाली आहेत. याशिवाय त्याने १४८ टी -२० बळीही घेतले आहेत. ख्रिस गेलने १३२९६ आणि किरोन पोलार्डने १०३७० धावा केल्या आहेत. भारताविषयी बोलताना विराट कोहलीने सर्वाधिक टी -२० धावा केल्या आहेत. त्याच्या खात्यात ९१२३ टी -२० धावा आहेत, तर रोहित शर्माने ८८५३ टी -२० धावा केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER