उद्धव ठाकरे म्हणाले होते, कुठल्याही पक्षात जा, तुला निवडून आणण्याची जबाबदारी माझी : दीपक केसरकर

CM Uddhav Thackeray And Deepak Kesarkar

मुंबई : मी शिवसेनेमध्ये (Shiv Sena) का गेलो? तर ज्यावेळी मी नारायण राणेंविरुद्ध (Narayan Rane) लढलो आणि माझी ताकद दाखवली, तेव्हा सगळ्या मोठमोठ्या पक्षांच्या मला ऑफर होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मला म्हणाले होते, कुठल्याही पक्षात जा, तुला निवडून आणण्याची जबाबदारी माझी. असं कोणीच करत नाही. ज्यांनी पद दिलं, त्यांच्याशी तरी प्रामाणिक राहायला हवं, अशा भावना माजी गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी व्यक्त केल्या.

कोकणात भाजपची लाट असताना मला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कार्यालयातून फोन आला होता. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री (मनोहर पर्रिकर) यांनी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एकत्र चर्चा करायला लावली होती. पण मी भाजपमध्ये गेलो नाही, असा गौप्यस्फोट केसरकर यांनी केला आहे. दीपक केसरकर नाराज असल्याच्या चर्चांनंतर केसरकरांनी स्पष्टीकरण दिले .

मी कोकणातील दहशतवादाविरोधात लढणार असून तो केवढाही मोठा माणूस असो, मी त्याविरुद्ध उभा राहणार आहे. मी भाजपमध्ये जाणार, या केवळ अफवा होत्या. माझी त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली होती; पण आपण कधीही शिवसेना सोडून जाणार नाही, हे त्यावेळीच स्पष्टपणे सांगितले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER