शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या स्वागत मिरवणुकीत उधळल्या नोटा

Purushottam Barde

सोलापूर :- शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या स्वागत मिरवणुकीत नोटा उधळण्याचा प्रकार सोलापूर येथे घडला आहे.

पुरूषोत्तम बरडे यांना सोलापूर जिल्हाप्रमुखाचा प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे. त्यांच्या स्वागत मिरवणुकीत शिवसैनिकांनी नोटांची उधळण केल्याने बरडे आता अडचणीत आल्याचे म्हटले जात आहे.

District Chief Purushottam Barde

प्रभारी जिल्हाप्रमुखपदी बरडे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचे डिजिटल फलकही झळकले. त्यावर ‘तुमचा बाप आला’, असा मजकूर नमूद करण्यात आला, हे येथे उल्लेखनीय. याबाबत टीका सुरू झाल्याने काही फलकांवरील हा मजकूर काढून त्याऐवजी ‘शिवसेनेचा वाघ आला’, असा मजकूर टाकण्यात आला, हे विशेष. शिवसेनेचे माजी मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांच्या विरोधातील राजकारणातून हे सारे सुरू असल्याचे म्हटले जात आहे. परिणामी, सेनेतील वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, स्वागतासाठी उभारलेल्या डिजिटल फलकांवरील ‘बाप आला’ हा मजकूर नमूद करण्यात आल्याबद्दल बरडे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी