
मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना ईडीने (ED) नोटीस बजावल्यानंतर शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला .
शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईतील अंमलबजावणी संचनालयाच्या कार्यालयासमोरच ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असे बॅनर लावले. संजय राऊत यांनी पत्नीला आलेल्या नोटिसीवर प्रतिक्रिया देताना ‘ईडी हा भाजपचा पोपट’ असल्याचा घणाघात केला आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप हा सामना आता आणखी रंगतदार होणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला