शिवसेनेला पहिलं यश, धुळ्यातील ग्रामपंचायतीवर भगवा फडकवला

Shanabhau Sonawane Dhule

धुळे :- राज्यात 14 हजार 232 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, धुळे जिल्ह्यातून शिवसेनेसाठीआनंदाची बातमी पुढे आली आहे. धुळे जिल्ह्यातील वडदे ही पहिली ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. शिंदखेडा तालुक्यातील वडदे ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा भगवा फडकवण्यात शिवसैनिकांना आलं आहे. वडदे गावानं ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून 45 वर्षांची आपली परंपरा कायम राखली.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा मधील वडदे ग्रामपंचायत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे आणि जिल्हा परिषद सदस्या सुनिताताई सोनवणे यांच्या नेतृत्तावत बिनविरोध झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाची प्रेरणा घेऊन ग्रामपंचात निवडणूक बिनविरोध केल्याचं शानाभाऊ सोनवणे यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाच्या प्रेरणा घेत शिवसैनिकांनी ग्रामपंचायत बिनविरोध केली. उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे व जिल्हा परिषद सदस्या सुनिताताई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिंदखेडा तालुक्यातील वडदे ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात आली. सीमा देवेसिंग भिल, कविता दिनेश चित्ते, शुभांगी सुनिल चित्ते, माधुरी किशोर कोळी, राजेंद्र बन्सिलाल मगरे, विजय अशोक चित्ते, प्रवीण किसन चित्ते यांची ग्रामपंचायतीवर बिनविरोध निवड झाली. शिवसेनेचा भगवा फडकवून गेल्या ४५ वर्षाची परंपरा वडदे गावकऱ्यांनी कायम ठेवली.

शिंदखेडा शहर प्रमुख सागर देसले व माजी शहर प्रमुख नंदकिशोर पाटील यांच्यासह वडदे गावातील गावकऱ्यांनी एकत्र येऊन वडदे गावाचा नावलौकिक शिंदखेडा तालुक्यात वाढवला आहे. वडदे येथील गावकऱ्यांनी शिंदखेडा तालुक्यात एक आदर्श निर्माण केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER