शिवसेना कंगनाच्या कुठल्याही टीकेला उत्तर देणार नाही ; नेत्यांना आणि प्रवक्त्यांना आदेश

Pankaja Munde & Sharad Pawar

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. या वक्त्यव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे . आता कंगनाने पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा विकून शिवसेनेची ‘सोनिया सेना’ (Sonia Sena) झाली आहे, अशी कडवट टीका तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली . मात्र अद्यापही शिवसेनेकडून यावर प्रत्युत्तर आलेले नाही .

शिवसेनेच्या नेत्यांना आणि प्रवक्त्यांना अजूनही या विषयावर न बोलण्याचे आदेश आहे. कालही शिवसेनेने या विषयावर कोणीही न बोलण्याचा आदेश दिला होता. अजूनही शिवसेनेचं या विषयावर मौनच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे यावर कधी बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, ‘मी जगले किंवा मेले तरी तुम्हाला एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही’ असं म्हणत कंगनाने उद्धव ठाकरे आणि करण जोहर यांचं नाव घेत धमकी दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER