पश्चिम बंगालमध्ये शिवसेना भाजपच मतांचं गणित बिघडवणार, विधानसभा निवडणूक लढवणार

Bengal-assembly-election

कोलकता : आगामी पश्‍चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकीत (Bengal-assembly-election) शिवसेना (Shivsena) भाजपच (BJP) गणित बिघडवण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. यासाठी अमरा बंगाल, उत्तर बंगा समाज पक्ष आणि उत्तर बंगा आदिवासी परिषद या पक्षांशी आघाडी करण्यात येणार आहे. झारग्राम येथील अजून एक पक्ष आघाडीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे राज्यातील सरचिटणीस अशोक सरकार यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यात भाजपची प्रतिमा बंगालीविरोधी आणि हुकूमशाही पक्ष अशी झाली आहे. आसाम, त्रिपुरासह ईशान्य भारतात ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे, तेथे बंगाली नागरिकांना भेदभावाची वागणूक दिली जात आहे. यामुळे बंगाली भाषा आणि संस्कृतीला विरोध करणाऱ्यांचा पराजय करण्याचा प्रयत्न ही आघाडी करेल. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील ही आघाडी विधानसभा निवडणुकीत शंभर उमेदवार उतरवणार आहे.

या आघाडीमुळे भाजपच्या मतांवर मोठा परिणाम होऊ शकतो, असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यावर राज्यातील भाजप नेत्यांनी ही युती हस्यास्पद असल्याचे म्हटले आहे. ज्या पक्षाचे बंगालमध्ये काहीही अस्तित्व नाही, त्याच्या आघाडीबद्दल बोलण्याची काहीही गरज नाही, असे नेत्यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER