गुगलवर खंडणी टाका सगळं कळेल… शिवसेना नेत्याचा मनसे नेत्याला टोला

मुंबई: मुंबई महापालिकेची निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत. मुंबई महापालिकेतल्या कारभारावरून अनेक वेळा शिवसेनेला डिवचणाऱ्या मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शुक्रवारी ट्विट करत शिवसेनेवर निशाण साधला होता.

मुंबई महापालिकेत वीरप्पन गँग काम करत आहे. ही वीरप्पन गँग महापालिकेची भरमसाट  लूट करत आहे. अनेक घोटाळे केले जात आहेत. तसंच स्थायी समितीची कामेही याच गँगला दिली जात आहेत. आता अशा गँगचे एन्काउंटर करावेच लागेल, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली होती. संदीप देशपांडे यांच्या टीकेला शिवसेनेच्या युवा सेनेचे  वरुण सरदेसाई यांनीदेखील प्रत्युत्तर दिले होते.

खरे वीरप्पन कोण, हे जनतेला चांगलेच माहिती आहे. आपल्यालाही माहीत करून घ्यायचे असेल तर ‘मनसे खंडणी’ असे फक्त google search करून बघावे. Google च्या पहिल्याच पेजवर या बातम्या सापडतील. सगळ्या बातम्या वेगवेगळ्या आहेत; पण प्रत्येक जिल्ह्यातील  यांची स्टोरी सेम टू सेम आहे, असे ट्विट वरुण सरदेसाईंनी केले. सरदेसाईंनी ट्विटमध्ये काही बातम्यांचे स्क्रीनशॉट शेअर केले होते.

वरुण सरदेसाई यांच्या या ट्विटनंतर आता पुन्हा संदीप देशपांडे यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. वरुण सरदेसाई म्हणाले, गुगलवर खंडणी टाका सगळं कळेल. आम्ही टाकून बघितलं, असं म्हणत गुगल सब जानता है, असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं. त्यामुळे आगामी काळात शिवसेना आणि मनसेमध्ये ट्विटरर चांगलंच रंगणार असल्याचे दिसून येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER