नितेश राणेंचा कणकवलीत पराभव करुन शिवसेना काय आहे, हे दाखवून देऊ ; वैभव नाईक भडकले

सिंधुदुर्ग: भाजप (bjp) नेते आमदार नितेश राणेंचा (Nitesh Rane) कणकवलीत पराभव करून शिवसेना (Shivsena) काय चीज आहे हे दाखवून देऊ, अशी गर्जना शिवसेना आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदावर भाजपचा अध्यक्ष झाल्यावर नितेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यांच्या टीकेला वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नितेश राणेंचा कणकवलीत पराभव करुन शिवसेना काय आहे, हे दाखवून देऊ. नारायण राणेंचं आव्हान आम्ही कधीच संपवलं. वैभव नाईक एक व्यक्ती म्हणून नाही तर सामान्य शिवसैनिक म्हणून राणेंना आव्हान देऊन 2014 च्या निवडणुकीत राणेंसारख्या माजी मुख्यमंत्र्याचा पराभव केला तर गेल्या निवडणूकीत माझ्या मुळेच नारायण राणेंनी पळ काढला, अशी टीका वैभव नाईक यांनी राणेंवर केली.

वैभव नाईक हे आमच्याशी आयुष्यात कधीच स्पर्धा करू शकत नाहीत. सिंधुदुर्गात राणेंना आव्हान देणारा किंवा धक्का देणा-याला दहा जन्म घ्यावे लागतील असे आव्हान नितेश राणे यांनी शिवसेनेला दिलं होतं. त्यांचं आव्हान स्वीकारत नितेश राणेंचा कणकवलीत पराभव करुन शिवसेना काय आहे, हे दाखवून देऊ, असा निर्धार आमदार वैभव नाईक यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER